Breaking

Monday, 15 June 2026

फॅबटेक मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती विश्‍लेषण शाखा: उज्ज्वल करिअरची नवी दिशा- डॉ. सोमनाथ ठिगळे

 




सांगोला: प्रतिनिधी


आजच्या वेगाने बदलणार्‍या तंत्रज्ञानप्रधान युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (-ीींळषळलळरश्र खपींशश्रश्रळसशपलश) व माहिती विश्‍लेषण (ऊरींर -परश्रूींळली) ही अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वाधिक मागणी असलेली आणि भविष्याभिमुख शाखा म्हणून उदयास आली आहे. डिजिटल क्रांतीच्या युगात माहितीचे व्यवस्थापन, विश्‍लेषण आणि त्यावर आधारित अचूक निर्णय घेण्यासाठी या तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असून या शाखेत करिअरची नवी दिशा असल्याचे मत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळे यांनी सांगितले.

    कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती विश्‍लेषण शाखेचे विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ ठिंगळे यांनी पञकारांशी संवाद साधताना मत व्यक्त केले.

या शाखेत विद्यार्थ्यांना बुद्धिमान संगणकीय प्रणाली, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, बिग डेटा, स्वयंचलित तंत्रज्ञान, प्रोग्रामिंग आणि माहिती विश्‍लेषण यांसारख्या आधुनिक विषयांचे सखोल ज्ञान दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्यांसह संशोधनाची वृत्ती, सर्जनशील विचारशक्ती आणि जटिल समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होते.

आज आरोग्य, शेती, बँकिंग, उद्योग, शिक्षण, ई-कॉमर्स, सायबर सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे या शाखेतील पदवीधरांना देश-विदेशातील नामांकित माहिती तंत्रज्ञान कंपन्या, संशोधन संस्था आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये आकर्षक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

विशेष म्हणजे, भारतासह संपूर्ण जगात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार होत असल्याने भविष्यात या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी आणखी वाढणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही शाखा केवळ पदवी प्राप्त करण्याचे माध्यम नसून जागतिक स्तरावरील करिअर घडविण्याची सुवर्णसंधी आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती विश्‍लेषण ही शाखा विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडत त्यांचे भविष्य अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि यशस्वी बनविणारी नवी दिशा ठरत आहे. भविष्यातील तंत्रज्ञानविश्‍वात नेतृत्व करण्याची क्षमता या शाखेमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते, हेच तिचे खरे वैशिष्ट्य आहे. असे हि डॉ. सोमनाथ ठिगळे यांनी सांगितले.