Breaking

Saturday, 13 June 2026

आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग उपोषणाला स्वराज्य संघटना सांगोला तालुक्याचा जाहीर पाठिंबा


सांगोला | प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आमदार रोहित दादा पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग उपोषणाला स्वराज्य संघटना, सांगोला तालुका यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन निवेदन सादर करत आंदोलनाला नैतिक व सक्रिय पाठिंबा दर्शविला.
राज्य शासनाने शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
स्वराज्य विधानसभा संघटक प्रमोद काशिद यांनी सांगितले की, सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि जनहिताच्या प्रश्नांवर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा.
यावेळी स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाला पाठिंबा देत शासनाने शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी मागणी उपस्थितांनी केली.