- निवृत्तीनाथ पालखी सोहळा मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणी केली पाहणी
करकंब(प्रतिनिधी):-
आषाढी पालखी सोहळ्याचे प्रस्थान पुढील महिन्यात होत असून पालखी मार्गांवरील गावातील कामे पूर्ण करून सोहळ्यातील वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन ह.भ.प. राहुल महाराज साळुंखे यांनी केले.
विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्रंबकेश्वर येथील संस्थानचे अध्यक्ष ह भ प राहुल महाराज साळुंखे व विश्वस्त नवनाथ महाराज गांगुर्डे व इतर सदस्य यांनी करकंब व पालखी मार्गांवरील मुक्कामी गावात येऊन पालखी स्थळाची पाहणी केली व ग्रामस्थासोबत विविध विषयावर चर्चा केली. प्रत्येक ग्रामपंचायत प्रशासनास विविध सोयी सुविधा संबंधि सूचना दिल्या ग्रामस्थांना पालखी नियोजनाचे व स्वागताचे निमंत्रण दिले.
या भागात अनेक पालख्या आषाढी वारीच्या दरम्यान येत असतात वारी नियोजनाचा निधी हा संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यास मिळत असल्याने या पालखी मधील वारकरी व भाविकांना सर्व सोयी सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना संस्थानचे अध्यक्ष साळुंखे महाराज यांनी प्रशासनास दिल्या. तसेच पालखी मार्गांवरील सर्व रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवून वारीच्या अगोदर कामे पूर्ण करावीत जेणेकरून पायी चालत असताना भाविकांना कोणताही त्रास होणार नाही.तसेच वारी काळात आरोग्य,स्वच्छता,वीज पुरवढा, गॅस पुरवढा, पोलीस बंदोबस्त, पाणी पुरवढा, स्वागतकमानी,निवारा शेड,ऍम्ब्युलन्स तसेच करकंब येथे भव्य असे होत असलेल्या रिंगण सोहळ्यासाठी मैदानाची स्वच्छता, स्टेज, मंडप, पाणी व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना यावेळी ह. भ. प. साळुंखे महाराज यांनी केल्या.
तसेच करकंब ते पांढरेवाडी, चिंचोली भोसे येथील रस्ते दुरुस्ती वारी पूर्वी करावेत याबाबत च्या सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख ,पंचायत समिती सदस्य राहुल पुरवत, ग्रामपंचायतचे उपसरपंच विवेक शिंगटे, महेंद्र शिंदे, सुनील मोहिते,प्रा. हेमंत कदम,अविनाश देवकते, संजीवकुमार म्हेत्रे, आकाश धोत्रे,महेश देशमुख, सागर देशमुख,काका देशमुख, कन्हैय्या मस्के व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोट :-
पालखी मार्गांवरील गावांना शासनाने निधी वाढवून दिला पाहिजे प्रत्येक वर्षी भाविकांची संख्या आषाढी वारीला वाढत आहे. त्यामुळे वारी मार्गांवरील बाजूच्या गावातही वारकरी मुक्कामी राहतात त्याही गावांना वारी अनुदान म्हणून निधी उपलब्ध करून द्यावा त्यासाठी जिल्हा परिषद मधून मी स्वतः पाठपुरावा करीत आहे.
- आदिनाथ देशमुख
(सदस्य, जि. प. सोलापूर)
