सांगोला (जि. सोलापूर) :
सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आज मुंबई येथे कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची भेट घेत तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून प्रभावित शेतकर्यांना नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
यावेळी कृषी मंत्री डॅा.दत्तात्रय मामा भरणे यांनी संबंधित अधिकार्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देवून शेतकर्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.
यावेळी आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी लवकरात लवकर पंचनामे करून शेतकर्यांना दिलासा देण्याचे मान्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
