Breaking

Wednesday, 13 May 2026

दहिगाव येथील समाज कल्याण सभापती संस्कृतताई सातपुते यांच्या जनता दरबाराला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद

 

संस्कृतीताईंचा एक कॉल जनतेचा प्रॉब्लेम सॉल

नातेपुते प्रतिनिधी : 



दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्य तथा जि.प. समाज कल्याण सभापती संस्कृतीताई राम सातपुते यांनी दहिगाव ता. माळशिरस येथील हनुमान मंदिरात दिनांक13 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता घेतलेल्याजनता दरबारला सामान्य जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दहिगाव जि प गटातील गावांमधील अनेक महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या जनता दरबारात अनेक नागरिकांनी आपल्या समस्या निवेदनाद्वारे व तोंडी मांडल्या सदर समस्यांची तत्काळ दखल घेत सभापती संस्कृतीताई सातपुते यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यास कॉल करून अनेक प्रश्‍न मार्गी लावले तसेच पाणी, रस्ते, वीज, शासकीय योजना, आरोग्य व शिक्षण यांसारख्या विविध विषयांवरील तक्रारी ऐकून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले जनता दरबारामुळे सामान्य नागरिकांना थेट सभापती संस्कृतीताई सातपुते यांच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचण्याची व आपल्या समस्या सोडवण्याची संधी मिळत असून, लोकांच्या समस्या जलद गतीने सोडविण्यास मदत होत आहे दहिगावात प्रथमच जनता दरबार उपलब्ध झाल्याने लोकांचा वेळ पैसा हेलपाटे वाचत असल्याने नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडल्यायावेळी दहिगाव येथील सत्यशील पाटील, सोसायटीचे चेअरमन रामचंद्र पाटील, गुरसाळे गण पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शेळके, सागर पाटील, भाजप नातेपुते मंडल अध्यक्ष संजय देशमुख, राहुल पाटील, राजेंद्र पाटील, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाबुराव खिलारे, पिरळे गावचे पोलीस पाटील औदुंबर बुधावले, अमर किर्दक, अविनाश देवकर, गणेश पाटील, भारत पाटील, सचिन खिलारे, अंकुश खिलारे, नवनाथ पाटोळे, गणेश भोकरे, नवनाथ झेंडे, श्रीरंग साळवे, लक्ष्मी भोसले, भैय्या साळवे, हनुमंत कर्चे आदी पदाधिकार्‍यांसह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते


 जि प समाज कल्याण सभापती संस्कृतीताई सातपुते यांनी दहिगाव येथे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेतला त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन जनता दरबाराला दहिगाव गटातील जनतेची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आढळून आली दहिगाव जि. प. गटामध्ये एकूण 12 गावे येतात त्या प्रत्येक गावातील शासकीय पदाधिकारी अधिकारी ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, पोलीस पाटील, धान्य दुकानदार, पोलीस बीट आमदार यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी पदाधिकारी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी गैरहजर होते याचे कारण शोधून त्यांना योग्य ती लेखी समज द्यावी वरिष्ठ पदाधिकार्‍याला प्रशासकीय अधिकारी कर्मचारी मान देत नसतील तर ते सर्वसामान्य जनतेची कशी कामे करीत असतील त्यांच्या गैरहजेरीतूनच हे जनता दरबाराच्या माध्यमातून स्पष्ट दिसून येत आहे जनता दरबाराला मिळालेला प्रतिसाद बघता दर महिन्यातून एकदा जनता दरबार घेण्यात यावा जनता दरबारामुळे बारा गावातील लोकांच्या समस्या निवारण बरोबर गावची रस्ते पाणी वीज, आरोग्य शिक्षण आदीबाबत समस्याही लक्षात येतात :जननी फाउंडेशन चे अध्यक्ष गणेश भोकरे धर्मपुरी


फोटो दहिगाव न्यूज