सांगोला/प्रतिनिधी :
सामाजिक बांधिलकी जपत आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने देवळे (ता. सांगोला) येथील गरजू नागरिक नवनाथ निवृत्ती जावीर यांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत यांच्या हस्ते पाच हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र यादव, प्रमोद काका दौंडे तसेच चंद्रशेखर कवडे उपस्थित होते. गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्यासाठी प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असून, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अनेकांना आधार देण्याचे काम संस्थेकडून केले जात असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
नवनाथ जावीर यांच्या वैद्यकीय उपचारासाठी ही मदत दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आपुलकी प्रतिष्ठान तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
