-
आरोग्य भवन, मुंबई येथे विशेष बैठकीत सोहळा संपन्न
राज्यातील ब्लड सेंटर्सच्या अडचणी सोडवण्याचे माननीय आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई/प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्यातील रक्तपेढ्यांच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार्या ’महा ब्लड सेंटर्स असोसिएशन’ (चइउअ) च्या अधिकृत लोगोचे (ङेसे) आज, 20 मे 2026 रोजी राज्याचे माननीय आरोग्यमंत्री प्रकाशजी अबिटकर यांच्या शुभहस्ते शानदार अनावरण करण्यात आले. मुंबई येथील ’आरोग्य भवन’ मध्ये आयोजित विशेष बैठकीत हा सोहळा पार पडला.
या प्रसंगी जे. जे. महानगर ब्लड सेंटरचे डेप्युटी डायरेक्टर डॉ. हितेश पगारे, असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जीवन सगरे, उपाध्यक्ष अविनाश ननवरे , सचिव सोमेश यावलकर, खजिनदार राहुल सैंदने, मुंबई विभागीय प्रमुख डॉ. जयंत गाडे आणि जयसिंग विश्वकर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत माननीय आरोग्यमंत्र्यांनी ’महा ब्लड सेंटर्स असोसिएशन’च्या गेल्या 3 वर्षांच्या सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील कार्याचा सविस्तर आढावा घेतला. संघटनेच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्रातील ब्लड सेंटर्सना येणार्या विविध अडचणी आणि समस्या मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्यावर सकारात्मक पाऊल उचलत, राज्यातील ब्लड सेंटर्सच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मंत्री महोदयांनी या वेळी दिले.
या लोगो अनावरणामुळे संघटनेला एक नवी ओळख मिळाली असून, आगामी काळात राज्यातील रक्त पुरवठा साखळी अधिक बळकट करण्यासाठी संघटना अधिक जोमाने काम करेल, असा विश्वास अध्यक्ष डॉ. जीवन सगरे यांनी व्यक्त केला.
