..
कोळा वार्ताहर
सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक बाळासाहेब राजाराम बिले यांची कन्या पुणे शहरातील प्रसिद्ध असलेल्या अश्विनी ट्युटोरिअल्सच्या संस्थापक संचालिका सौ अश्विनी शेखर बिले भोसले यांना कोचिंग क्लासेस क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य व टॅलेंट कट्टा पुणे यांच्या तर्फे 2025-26 च्या महाराष्ट्र राज्यभूषण पुरस्कार सन्मानपत्र सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट असोसिएशचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन धवने पाटिल व ए आर जे ग्रुपचे इंटरनॅशनल ग्रुप संस्थापक डॉ. जितेंद्र दाते यांच्या हस्ते गौरव करून सन्मान करण्यात आला आहे त्यांच्या या कार्याचे कोळा पाचेगाव पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरांमध्ये जाऊन संस्थापक संचालिका असलेल्या सौ. अश्विनी शेखर भोसले बिले यांनी अश्विनी ट्युटोरियल्स या कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केले याची दखल घेत त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान गौरव करण्यात आला आहे त्याचे कौतुक होत आहे वडील बाळासाहेब बिले यांनी हालाकीच्या परिस्थितीमधून मुलींना शिकवून पुढे जाण्यासाठी मोठी प्रेरणा दिल्यामुळे हे यश मिळाले आहे आपल्या स्वतःच्या मुलांना उत्तम संस्कार देऊन त्यांना यशस्वी घडविण्यासोबतच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुलीचा सन्मान झाला आहे याचा अभिमान आहे. या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
या पुरस्कार सोहळा कार्यक्रमास टॅलेंट कट्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिपक जाधव मराठी अभ्यास मंडळ अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, देऊळ बंद चित्रपटाचे अभिनेत्री आर्या घारे सेवानिवृत्त शिक्षक बाळासाहेब बिले. सौ सुवर्णा बिले,शेखर भोसले इंस्टाग्राम फ्रेमर तेजस्विनी बिले, अक्षय बिले यांच्यासह परिवारातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
