सांगोला प्रतिनिधी-
भ्रष्टाचार निवारण भारत या संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी महूद येथील विशाल येलपले यांची तर उपाध्यक्षपदी प्रतीक मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय मानव अधिकार तथा भ्रष्टाचार निवारण भारत या संस्थेचे संस्थापक महेश मीनाजी, या संस्थेचे राष्ट्रीय मंत्री सोमनाथ नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी विशाल मधुकर येलपले यांची तर उपाध्यक्षपदी प्रतीक दिलीप मोरे यांची निवड करण्यात आली आहे.शेतकरी व महिलांवरील अन्याय, शासकीय फी व्यतिरिक्त ज्यादा पैसे घेऊन काम करणारे सरकारी कर्मचारी यासह महाराष्ट्रातील इतर भ्रष्टाचाला आळा घालण्याच्या उद्देशाने तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना काम करते आहे, असे संघटनेचे राष्ट्रीय मंत्री सोमनाथ नाईकनवरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी नूतन अध्यक्ष विशाल येलपले व उपाध्यक्ष प्रतीक मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंढरपूर तालुका अध्यक्ष सुनील कदम, माण तालुका अध्यक्ष जनार्दन मासाळ, माळशिरस तालुका कार्याध्यक्ष सचिन तुपे, शंकर महादेवकर, अनिल गणेशकर, राजेश चव्हाण, राजेंद्र ठोंबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
