सांगोला शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी तयारीला सुरुवात झाली असून, यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 14 मे 2026 रोजी होणार्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
शनिवार, 25 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता सांगोला येथील नगर वाचन मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जयंती उत्सवाचे नियोजन, विविध उपक्रम, मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमांबाबत चर्चा होणार आहे.
सांगोला शहरातील सर्व शंभू प्रेमी व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सव भव्य करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथा आणि इतिहासाची आठवण जागवणारा हा उत्सव अधिक प्रभावी व प्रेरणादायी ठरावा, यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे.
