सांगोला प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शिक्षकांना बदनाम करून गोरगरीब व बहुजन समाजाचे शिक्षण धोक्यात आणणारी धोरणे सतत राबवली जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षक समितीचे नेते तथा छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेल्या ’ चक्रव्यूहात शिक्षण’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न झाला.
मंगळवेढा येथील जोगेश्वरी मंगल कार्यालयात आयोजित भव्य सोहळ्यात माजी मंत्री प्रा. डॉ.लक्ष्मणराव ढोबळे, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे हे होते . यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, कल्याण शिंदे, धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, रयत सेवक बँकेचे चेअरमन नंदकिशोर गायकवाड, आटपाडीचे नगराध्यक्ष यु.टी. जाधव, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, अँड. नंदकुमार पवार, कोल्हापूर शिक्षक बँकेच्या चेअरमन वर्षाताई केनवडे, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा डोके,प्रकाशक इंद्रजित घुले, शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर, सुधाकर सावंत, अनिल कादे , राजन सावंत,मसापचे अध्यक्ष हजरत काझी , अमोघसिध्द कोळी, शरद रूपनवर, सुनील कोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी गोरगरीब व बहुजन समाजाचे शिक्षण वाचविण्यासाठी समाजाला सोबत घेऊन लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता असून समाज जागृतीसाठी चक्रव्यूहात शिक्षण हे पुस्तक उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. याशिवाय प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी सुरेश पवार यांनी प्रभावी वक्ते म्हणून लौकिक मिळविला असून पुस्तक रूपाने त्यांचे विचार सर्वदूर पोहचतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिक्षक नेते उदय शिंदे, यु.टी. जाधव यांनीही मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश पवार यांनी केले. यावेळी माजी सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार सचिन कुलकर्णी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रावसाहेब सुर्यवंशी, सौरभ रोंगे, विजय पवार, दत्तात्रय मासाळ, चंद्रकांत पवार, निंगप्पा बिराजदार, अनिल दत्तू, विठ्ठल चौधरी, सुदर्शन रोंगे यांनी परिश्रम घेतले. या सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपर्यांतून शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
