सांगोला / प्रतिनिधी :
सांगोला शहरातील कडलास रोड परिसरातील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे विविध आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नागरिकांना परवडणाऱ्या दरात तसेच विविध शासकीय योजनांअंतर्गत उपचार दिले जात आहेत.
हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PM-JAY), महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY), बांधकाम कामगार योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, ESIC योजना तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्सची कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. या योजनांअंतर्गत अनेक आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.
विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये नॉर्मल डिलिव्हरीद्वारे मुलगी जन्मल्यास त्या प्रसूतीचे हॉस्पिटल बिल माफ करण्याची विशेष योजना राबविण्यात येत आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित केले जाते.
हॉस्पिटलमध्ये ICU, NICU, PICU, सुसज्ज प्रसूती विभाग, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, डिजिटल एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सी-आर्म, एंडोस्कोपी व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, ईसीजी, व्हेंटिलेटर, कॉल्पोस्कोपी, डोळे तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा, २४ तास लॅबोरेटरी, २४ तास मेडिकल व अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध आहेत.
येथे मेडिसिन, सर्जरी, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, अस्थिरोग, त्वचारोग, नेत्ररोग, बालरोग, कान-नाक-घसा आदी विभागांमध्ये उपचार दिले जातात. दमा, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, सर्पदंश, न्युमोनिया, थायरॉईड यांसारख्या आजारांवर उपचार केले जातात. तसेच अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसील, मूत्रविकार, मुळव्याध, टॉन्सिल, सायनस, फ्रॅक्चर तसेच विविध शस्त्रक्रियाही येथे केल्या जातात.
हॉस्पिटलमध्ये डॉ. शेखर जवळगे (MBBS,
MD), डॉ. दीपांकर चंद्रकापूरे (MBBS, MS ENT), डॉ. अजित औताडे (MBBS,
MS), डॉ. धवल आवताडे (MS Ortho), डॉ. स्वाती
खंडागळे (BHMS), डॉ. बसवराज बिराजदार (BHMS) आणि डॉ. परेश
खंडागळे (BAMS, DRCH, EMS) हे तज्ज्ञ डॉक्टर सेवा देत आहेत.
कडलास रोड, सांगोला (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे असलेल्या या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.
संपर्क : 9689989090 / 7888500197
