Breaking

Wednesday, 11 March 2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 सांगोला येथे महिला दिन अतिशय उत्साहात साजरा

 


सांगोला प्रतिनिधी -




महिला सक्षमीकरण सप्ताह 2 ते 8 आज महिला दिनाच्या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेविका सौ.वैशाली सतीश सावंत व सौ. दिव्यांणी सौरभ दौंडे व कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या डॉक्टर स्वरा अमित मेटकरी व डॉक्टर प्रीती योगेश बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब तुकाराम सावंत यांनी प्रास्ताविकात महिला सप्ताह सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत 2 ते 8 मार्च दरम्यान मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्या आदेशान्वये आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक सांगोला येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले जसे- कर्तबगार महिला सन्मान, रांगोळी स्पर्धा, पाककला, संगीत खुर्ची, फनी गेम्स व इतर स्पर्धा

आहेत असे सांगून सर्व महिलांनी सर्व स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपल्या कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख पाहुणे यांच्या आरोग्य विषयक व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे सांगून सर्व पालकांनी मराठी शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा व आपल्या शाळा नंबर एक मराठी शाळेत आपल्या आसपास असणार्‍या विद्यार्थ्यांना शाळेत घालण्यासाठी प्रवृत्त करावे व गुणवत्ता पूर्ण शिक्षण आमची शाळा देते व भविष्यातही देणारच अशी ग्वाही देऊन सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

नूतन नगरसेवक सौ. वैशाली सतीश सावंत व सौ. देवयानी सौरभ दौंडे यांचा कर्तबगार महिला म्हणून शाळेच्या वतीने शॉल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच डॉक्टर स्वरा अमित मेटकरी (बीडीएस ) युगांत हॉस्पिटल अँड डेंटल क्लिनिक कडलास नाका सांगोला स्वतःच्या दवाखान्यात दंतवैद्यकीय म्हणून सेवेत कार्यरत असणार्‍या त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक नंबर सांगोला शाळेच्या वतीने त्यांचा कर्तबगार महिला म्हणून सन्मान करण्यात आला. व डॉक्टर प्रिती योगेश बाबर (इकचड उ.ॠ.ज)(वळशींळलळरप रपव र्पीीींळींळेपळीीं ) स्पंदन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत त्यांचं कार्य उत्तम असल्यामुळे त्यांना आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक सांगोलाच्या वतीने कर्तबगार महिला म्हणून सन्मान करण्यात आला.

त्यानंतर सांगोला केंद्राचे केंद्रप्रमुख होवाळ कैलास दादू महिला दिनाचे महत्त्व सांगून विश्‍व नारी कवितेतून महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व हा कार्यक्रम संपूर्ण सांगोला केंद्रातील शाळेत चालू आहे असे सांगून आपले मनोगत व्यक्त केले.

यानंतर डॉक्टर स्वरा अमित मेटकरी मॅडम यांनी महिलांनी आरोग्य सांभाळले पाहिजे तसेच महिला दिन आपण का साजरा करतो त्याचे सविस्तर अशी माहिती सर्व महिलांना दिली तसेच मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे कोणत्याही क्षेत्रामध्ये तिने उत्साहाने कार्य केले पाहिजे व कार्य करत आहेत व सर्व महिलांनी आत्मनिर्भर झाले पाहिजे असे सांगून मराठी शाळा ह्या टिकल्या पाहिजेत मी सुद्धा डॉक्टर झाले पण माझे प्राथमिक शिक्षण हे मराठी शाळेतूनच झाले असे सांगून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर डॉक्टर प्रीती योगेश बाबर यांनी आपल्या आरोग्य विषयक व्याख्यानातून सर्व विद्यार्थी व महिलांना सांगितले की आपले आरोग्य हेच आपले धन आहे ते आपण टिकविले पाहिजे.आरोग्यम् धनसंपदा आपण आपल्या आरोग्याकडे दररोज लक्ष दिले पाहिजे, आहार चांगला ठेवला पाहिजे व्यायाम केला पाहिजे,योगा केले पाहिजे आज आपले मन हे सुद्धा पॉझिटिव्ह ठेवले पाहिजे इत्यादी अनमोल असे मार्गदर्शन केले.

 तसेच नगरसेविका सौ. वैशाली सतीश सावंत मॅडमनी सर्व मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे कोणत्याही क्षेत्रात कार्य करण्यास पुढाकार घेतला पाहिजे एवढे बोलून सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या

 व नगरसेविका सौ. दिव्यांणी सौरभ दौंडे मॅडमनी सर्वप्रथम महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मराठी शाळेचे महत्त्व सांगितले तसेच एक स्त्री शिकली तर घरातील सर्व कुटुंब शिकते असे सांगून स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व स्वतःसाठी ही महिलांनी वेळ काढला पाहिजे , स्वतःचे आरोग्य सांभाळले पाहिजे असे सांगून आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पालक वर्गातूनही फिरदोश अल्लारखा खतीब यांनीही महिला दिन साजरा का करावा सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शाळा का काढली कशी काढली कोणत्या वातावरणात काढली याची सविस्तर माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

यानंतर फनी गेम्स घेण्यात आले त्यामध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्वाती तानाजी गायकवाड,पूजा अमोल शिंगारे द्वितीय क्रमांक,

 तृतीय क्रमांक भाग्यश्री मारुती खुने,फनी गेम्स मध्ये स्वाती तानाजी गायकवाड प्रथम क्रमांक, रुकैया काझम इराणी द्वितीय क्रमांक, पूजा तात्यासाहेब गावडे तृतीय क्रमांक, संगीत खुर्ची मध्ये रुकसाना असिफ शेख प्रथम क्रमांक, भाग्यश्री मारुती खुने द्वितीय क्रमांक, पूजा अमोल शिंगारे तृतीय क्रमांक,मेहंदी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सबा शेख,द्वितीय क्रमांक नाजमीर निसार मुलांणी, तृतीय क्रमांक रुकसाना आसिफ शेख ज्या महिलांचे स्पर्धेमध्ये क्रमांक आले त्यांना प्रथम क्रमांकासाठी कपचा सेट द्वितीय क्रमांक साठी स्टीलचा डब्बा व तृतीय क्रमांकासाठी स्टीलचे ताट व उत्तेजनार्थ बिग स्क्वेअर रजिस्टर देण्यात आले व शाळेतील सहशिक्षिका श्रीमती शिलेदार वैशाली तातोबा मॅडमनी स्वनिर्मित कविता बत्ती सर्वांसमोर म्हणून दाखविली व सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब तुकाराम सावंत यांनी सर्वांचे आभार मानले सर्वाना पेढे देऊन कार्यक्रमाची सांगता केली.