नाझरे प्रतिनिधी -
नाझरे ता. सांगोला येथे सध्या महावितरण कार्यालयाकडून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू आहे परंतु स्मार्ट मीटर मधून ग्राहक गोंडस नावाप्रमाणे स्मार्ट न होता अधिक चिंतेत आहे व या मीटर मधून अधिक वीज बिल येत असल्याची अनेकांची तक्रार आहे व ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचा यास विरोध आहे तरी मीटर बसू नये व याबाबतचे निवेदन नाझरे महावितरण कार्यालयास देण्यात आले.
स्मार्ट मीटर एका कंपनीमार्फत बसविले जात असून हे मीटर वेगाने फिरत आहे व भविष्यात रिचार्ज सिस्टीमचे होणार आहे तरी महावितरण कार्यालयाने जबरदस्तीने हे मीटर बसवू नयेत असे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय सरगर यांनी सांगितले. तर स्मार्ट मीटर बसवण्यास सर्व ग्रामस्थांचा विरोध आहे व तसा ठराव ग्रामपंचायत झाला आहे तरीही मीटर बसविल्यास तीव्र आंदोलन करू असे सामाजिक कार्यकर्ते दादासो हरिहर यांनी सांगितले.
*स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही..*
*वीज कायदा 2003 च्या कलम 55 नुसार स्मार्ट विविध मीटर लावणे बंधनकारक नाही व भविष्यातील लूटमार थांबविण्यासाठी जनतेने या तीव्र विरोध करावा व हे मीटर बसविणे अनिवार्य नाही.*
. *मा. रविराज शेटे नाझरे*
