जि.प. प्रा. शाळा नाझरे ता. सांगोला व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी उमेश हरी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सौ. अश्विनी नितीन रायचुरे याची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी युवराज लक्ष्मण शेटे, सौ. सोनाली संतोष भुषारी, संभाजी शिवाजी निंबाळकर, सौ. अमृता अमोल बनसोडे, प्रवीण दिलीप पाटील, सौ. पल्लवी बिराजी जावीर, सौ. धनश्री श्रीधर देशपांडे, यांची सदस्य पदी तर शिक्षक प्रतिनिधी गंगाधर जुंधळे व मुख्याध्यापक राजाराम कोळी यांची सचिव पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी मा. अध्यक्ष ओंकार देशपांडे, उपाध्यक्ष सचिन वाघमारे, शिक्षक शिवाजी अडसूळ, दादासाहेब बदडे, शिक्षिका नयना पाटील, योगिता शांत, सुनिता विधाते, माधुरी जुंदळे, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
