Breaking

Friday, 6 March 2026

सांगोला शहरात महात्मा जोतीबा फुले यांच्या नावे भव्य उद्यानाची मागणी: नगरसेवक रमेश पांडुरंग जाधव यांचे पत्र*

 

सांगोला प्रतिनिधी -




सांगोला शहरातील महात्मा फुले चौक येथील सर्व्हे नंबर 247 आरक्षण क्रमांक 34 विकसित करून त्याठिकाणी ‘महात्मा जोतीबा फुले उद्यान’ नावाने भव्य उद्यान विकसित करण्याची मागणी नगरसेवक व गटनेते रमेश पांडुरंग जाधव यांनी सांगोला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंद माने यांच्याकडे केली आहे.

गटनेते रमेश जाधव यांनी सांगोला शहरातील महात्मा फुले चौक येथील आरक्षण क्र. 34 हे ‘महात्मा जोतीबा फुले उद्यान’ म्हणून नामकरण करावे. या उद्यानात महात्मा जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे भव्य शिल्प उभारण्यात यावे. तसेच महात्मा जोतीबा फुले यांनी रायगडावरील समाधी शोधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी सार्वजनिक शिवजयंतीची सुरुवात केली असल्याने तसेच हा इतिहास नविन पिढीला माहिती होण्यासाठी या उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग आधोरेखित करणारी भव्य शिवसृष्टी उभारण्यात यावी अशी मागणी केली आहे.

ही मागणी मान्य झाल्यास सांगोला शहराला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला साजेसे एक भव्य हिरवेगार उद्यान मिळेल. यामुळे शहराच्या सांस्कृतिक व पर्यावरणीय विकासाला चालना मिळेल.

सांगोला नगरपरिषदेने आता या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकां मधून व्यक्त केली जात आहे.