सांगोला प्रतिनिधी -
सुप्रसिद्ध कवी वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिनाचऔचित साधून महात्मा फुले कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगोला आणि आय.क्यू.ए.सी विभाग आणि मराठी भाषा स्त्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून मेडशिंगी येथील माजी प्राचार्य सुनील नष्ठ हे लाभले होते. तर राजापूर उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय तोडकरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष धर्मराज बोराडे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉक्टर विद्युत पांढरे प्रा. डॉ. नाथाजी कांबळे प्रा.दत्तात्रय वाघमारे दीपक डिकोळे आदी उपस्थित होते.
सुरुवातीला प्रा.डॉ. नाथाजी कांबळे यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी मराठी भाषा दिनाचे महत्व सांगत कार्यक्रमाचे स्वरूप विशद केले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले संजय तोडकरी यांनी मी कसा घडलो. हे अगदी थोडक्यात सांगितले त्यात त्यांनी आपल्या आईने तिखट बनवून दिलेला किस्सा सांगितला. कवी संमेलनाची सुरुवात प्राध्यापक दत्तात्रय वाघमारे यांनी कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेने सुरुवात केली. या कवितेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विद्युलता पांढरे यांनीही आपल्या सुंदर आवाजामध्ये कविता सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी रेणुका कासर शुभम डवले स्वाती पवार वैभव ऐवळे श्वेता रासकर पियुष चव्हाण सविता गव्हाणे स्वप्नील सावंत महंमद पाटील आदी कवीने आपल्या सुंदर रचना सादर केल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य सुनील नष्ठ यांनी मराठी भाषेविषयी विचार व्यक्त करताना जगण्यातले सौंदर्य हे मराठी भाषेत आहे मराठी भाषेचा तुम्ही आयुष्य जगतताना भरभरून आस्वाद घेतला पाहिजे. मराठी भाषेची थोरवी सांगताना मा. प्राचार्य नष्ट यांनी आपल्या पहाडी आवाजात कविता सादर करून कार्यक्रमाचा शेवट केला. शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.विद्युलता पांढरे यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेचे महत्व सांगितले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.दत्तात्रय वाघमारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल दीपक डेकोळे यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिल.
