Breaking

Sunday, 1 March 2026

संभाजी ब्रिगेड च्या तालुकाध्यक्ष पदी वैभव केदार तर जिल्हा समन्वयक पदी राजु शिंदे यांची निवड

 

सांगोला/प्रतिनिधी ः 





मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड च्या नूतन तालुकाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते,खरेदी विक्री संघाचे संचालक वैभव केदार यांची तर सोलापुर जिल्हा समन्वयक पदी राजू शिंदे यांची निवड करण्यात आली.काल सारथी भवन पुणे येथे संभाजी ब्रिगेड ची आढावा बैठक व पुनर्बांधणी संबंधित बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत या निवडी पार पडल्या.

संभाजी ब्रिगेड ही संघटना गेली 30 वर्षे मराठा बहुजन समाजातील युवक आर्थिक सक्षम झाला पाहिजे व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करते.याच अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते वैभव केदार यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून तर राजू शिंदे यांची जिल्हा समन्वयक पदी निवड केली

यावेळी नूतन पदाधिकार्‍यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड,महासचिव सुभाष बोरकर,प्रदेश संघटक दिपकदादा वाडदेकर,प्रदीप कणसे,जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील,मल्हार गायकवाड,ओमराज मोहिते व महाराष्ट्रातून असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते