कोळा/प्रतिनिधी ः
कोळा गावातील भटकंती ग्रुपने 1 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर करत केवळ एक ट्रेक पूर्ण केला नाही, तर ग्रामीण युवकांच्या सामूहिक शक्तीचा प्रभावी नमुना उभा केला. सुमारे 1646 मीटर उंची गाठताना त्यांनी शिस्त, संयम, शांतता आणि संघभावना यांचा आदर्श घालून दिला.
या ग्रुपचा प्रवास एका दिवसाचा नाही. यापूर्वी तोरणा किल्ला, राजगड,रायगड, शिवनेरी किल्ला, प्रतापगड, देवगिरी किल्ला, हंम्पी,नळदुर्ग, पावनखिंड,सिंहगड,पन्हाळा किल्ला, अकलूज भुईकोट किल्ला,पुरंदर, विशाळगड,जंजिरा, सिंधुदुर्ग,विजयदुर्ग, गगनबावडा,हरिहर किल्ला,सज्जनगड, दापोली किल्ला, मच्छिंद्रगड,अजिंक्यतारा किल्ला,वासोटा किल्ला,कोळदुर्ग आणि भूपाळगड यांसारखे गड सर करत त्यांनी इतिहासाचा ठेवा अनुभवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमातून प्रेरणा घेत आजच्या पिढीने ध्येयवादाची वाट निवडली आहे.
या मोहिमेचे नेतृत्व शंकर आलदर ( सत्यम ) यांनी संयमी व नियोजनबद्ध पद्धतीने केले. संकटसमयी शांत राहून योग्य निर्णय घेणे हे त्यांचे बलस्थान ठरले.सावंता सरगर हे ग्रुपचे प्रेरणास्थान.. कठीण टप्प्यावरही हसतमुख राहून इतरांना उभारी देणारे.भिमराव माळी शारीरिक तंदुरुस्ती आणि जिद्दीमुळे अवघड चढाई सहज पार करणारे.जे. के. कांबळे सर इतिहासाची जाण असलेले,प्रत्येक गडामागील कथा सांगत तरुणांना विचारप्रवृत्त करणारे. दत्ता आलदर सर शिस्तप्रिय,सुरक्षिततेची काटेकोर अंमलबजावणी करणारे.परमेश्वर आलदर शांत व जबाबदार, साहित्य व्यवस्थापनात दक्ष.तिपान्ना खांडेकर सर धैर्यशील,कठीण क्षणी आत्मविश्वास वाढवणारे.आनंदा आलदर सर सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतीक, थकवा दूर करणारी ऊर्जा देणारे.तानाजी कोळेकर सर वेगवान व तत्पर, पुढील वाट तपासून सुरक्षितता सुनिश्चित करणारे.तानाजी वाघमोडे सर संघभावना जपणारे, सर्वांना एकत्र ठेवण्याची कला अवगत.नाईनवाड सर वेळेचे भान राखणारे,नियोजनात काटेकोर. निलेश मदने सर सर्वांना हसतमुख ठेवून व ऐतिहासिक नोंदी ठेवून आठवणी जतन करणारे. तुकाराम आलदर सर संयमी व सहकार्यशील, प्रत्येक सदस्याला साथ देणारे.विजय आलदर उत्साही व ऊर्जावान, कठीण टप्प्यावर पुढाकार घेणारे. नाना आलदर अनुभवसंपन्न व सावधगिरीचा सल्ला देत मार्गदर्शन करणारे. शुभम मदने तरुण जोशाचे प्रतीक,
नव्या आव्हानांना सामोरे जाण्यास सदैव सज्ज. ही मोहीम केवळ गिर्यारोहणापुरती मर्यादित नसून, ग्रामीण युवकांनी सकारात्मक दिशा निवडल्यास किती मोठे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, याचा संदेश देते. निसर्गसंवर्धन, स्वच्छता आणि ऐतिहासिक वारशाबद्दल आदर या मूल्यांची जपणूक करत त्यांनी पुढील पिढीसमोर आदर्श ठेवला आहे.
कोळा गावातील या तरुणांची जिद्द आणि एकजूट हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य. शिखर सर केल्याचा अभिमान जितका उंच, तितकीच त्यांच्या विचारांची उंचीही प्रेरणादायी ठरावी, हीच अपेक्षा.
