Breaking

Monday, 23 March 2026

माजी सरपंचाचा अनोखा प्रकार चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच करतोय दूध डेअरीचा व्यवसाय

  

सांगोला/प्रतिनिधी ः 



सांगोला तालुक्यातील वाणीचिंचाळे गावचे माजी सरपंच म्हणून कार्यरत राहणार्‍या सरपंचांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच दूध डेअरीचा व्यवसाय सुरू केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. या अजब प्रकाराला ग्रामपंचायतीने कोणताही पायबंद घातल्या नसल्याचे दिसून येत आहे . सदर माजी सरपंच ग्रामपंचायतला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे कारण त्यांना वारंवार या ठिकाणाहून व्यवसाय बंद करण्याचे तोंडी सांगितले होते परंतु सदर व्यक्ती हे कोणाचेही ऐकत नसल्याचे दिसून येत आहे.

 तसेच या कार्यालय परिसरात ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून एक अहिल्यादेवी होळकरच्या नावाने गार्डन तयार केले आहे परंतु या दुधाच्या व्यवसायामुळे येथील वाहनांच्या ये. जा  करण्याने सदर गार्डनचे नुकसान होत आहे. पाईप फुटणे, झाडांची मोडतोड करणे, तसेच स्वागत कमानीला धोका करणे असे प्रकार येथे झाल्याचे दिसून येत आहे. परंतु ग्रामसेवक प्रशासनाचा प्रमुख म्हणून कार्यरत असताना कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याने युवकांनी संबंधित प्रकाराबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्याचे ठरवले आहे. तसेच जर दोन दिवसात सदर प्रकार बंद न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन पंचायत समिती सांगोला येथे करण्याचे ठरवले आहे.