Breaking

Wednesday, 4 February 2026

सांगोला तालुक्यातील एक एकरही जिरायत ठेवणार नाही: माजी आमदार शहाजीबापू पाटील

 


कडलास गटातील सर्वच गावातून या उमेदवारांना प्रचंड लीड देणार: कार्यकर्त्यांचा निर्धार

कडलास जिल्हा परिषद गटातील व गणातील वाटंबरे, अकोला, केदारवाडी, कडलास येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा संपन्न 



सांगोला/ प्रतिनिधी:

 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सांगोला तालुक्यात महायुती अस्तित्वात आली. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सुरू आहेत. सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. तालुक्यातील विजेचा प्रश्‍न व समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. माणनदी व कोरडा नदीला कॅनॉलचा दर्जा दिला आहे. भविष्यातही माण नदीचे पाणी हटू देणार नाही. तालुक्यातील एक एकरही क्षेत्र जिरायत ठेवणार नाही असे आश्‍वासन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले .

पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले,तालुक्यातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे तयार केले जातील. नगरपालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आणली याची दखल घेत नगरविकासमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला शहराच्या विकासासाठी 150 कोटी रुपयांचा निधी दिला. ही माझी ताकद नसून शिवसेनेची ताकद आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सुरू असून ग्रामविकास खाते पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आहे. शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले व मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. तालुक्यातील दोन्ही आमदारांच्या हातून गेल्या वर्षभरात एकही विकासाचे काम झालं नाही. परंतु मी आणलेल्या साडेपाच हजार कोटी रुपये निधीतून तालुक्याचा विकास आजही सुरू आहे असे विचार माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी युवकनेते योगेशदादा खटकाळे म्हणाले ,वाटंबरे, अकोला गावच्या विकासासाठी आम्ही कधीच कमी पडणार नाही. कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेच्या शोभाताई खटकाळे व पंचायत समिती गणाच्या शिवसेनेच्या उमेदवार राणीताई पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करावे . बापूंनी केलेल्या विकास कामाची पावती म्हणून दोन्ही उमेदवारांना विजयी करून विकास कामाची संधी द्यावी. 

वाटंबरे येथील सभेमध्ये भाजपच्या कार्यकारणी सदस्या राजश्रीताई नागणे पाटील, प्रतीक पवार ,मधुकर पवार, दत्तात्रय पवार ,विकास पवार यांनी मनोगत व्यक्त केले. अकोला येथील सभेमध्ये सुनील शिंदे, ड. महादेव कांबळे, प्रतीक पवार यांनी मनोगत व्यक्त केले. 

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी उमेदवार शोभाताई खटकाळे ,पंचायत समिती गणाच्या उमेदवार राणीताई पाटील, उपनगराध्यक्ष नितीन इंगवले , नगरसेविका राणीताई माने, भाजपचे ज्येष्ठनेते शिवाजीअण्णा गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकभाऊ शिंदे, सुभाष पवार नगरसेविका तनुजा एरंडे ,नगरसेवक माऊली तेली ,नगरसेवक अरूण पाटील, नगरसेवक प्रशांत धनवजीर, नगरसेवक काशिलिंग गावडे, तारका खटकाळे उद्योगपती बाळासाहेब आसबे ,भागवत शिंदे,चेअरमन अनिल खटकाळे, राजलक्ष्मीताई पाटील, उद्योगपती बाळासाहेब झपके, युवानेते गुंडादादा खटकाळे, उपसरपंच महादेव शिंदे, समाधान खटकाळे आदी मान्यवर महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग उपस्थित होते.