Breaking

Wednesday, 4 February 2026

तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा: माजी आम. शहाजीबापू पाटील

 



कडलास जिल्हा परिषद गटातील वझरे,चिणके,अजनाळे,य.मंगेवाडी, कमलापूर, गोडसेवाडी येथे महायुतीच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व अजनाळे गणाच्या उमेदवार शितल भडंगे यांच्या प्रचारसभांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 




सांगोला/ प्रतिनिधी: 

सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजूट करावी. सत्तेच्या बाजूने राहिल्यास विकास करणे सोपे होते. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.

यावेळी युवानेते योगेशदादा खटकाळे म्हणाले, कडलास जिल्हा परिषद गटाच्या महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व अजनाळे पंचायत समिती गणाच्या उमेदवार शितल भडंगे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून आम्हाला कडलास गटाच्या विकासाची संधी द्यावी. पाच वर्षात जनतेच्या विकास कामांमध्ये आम्ही कोठेही मागे राहणार नाही असा ठाम विश्‍वास व्यक्त केला.

यावेळी वझरे येथे वसंत पाटील, बापू वाघमारे, महेश वाघमारे, यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच चिणके येथे उद्योगपती बाळासाहेब काटकर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, नगरसेविका राणीताई माने, यलमर मंगेवाडी येथे बाळकृष्ण येलपले, कमलापूर येथे पप्पू ऐवळे, अजनाळे येथे उपसरपंच बापुराव कोळवले यांनी आपल्या मनोगतात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भविष्यकालीन विकास योजनांना पाठबळ देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन केले. 

आजनाळे पंचायत समिती गणाच्या उमेदवार शितल भडंगे म्हणाल्या,विकास कामासाठी माझी उमेदवारी असून मला सेवा करण्याची संधी द्यावी.

 कडलास जिल्हा परिषद गटातील व अजनाळे गणातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नगरसेविका राणीताई माने, सरपंच बानू चव्हाण, नगरसेविका तनुजा एरंडे, नगरसेवक प्रशांत धनवजीर, नगरसेवक अरुण पाटील,नगरसेवक माऊली तेली, शिवसेनेचे युवानेते गुंडादादा खटकाळे, नगरसेवक काशिलिंग गावडे, उद्योगपती बाळासाहेब आसबे, उद्योगपती माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, बहुजन नेते, बापूसाहेब ठोकळे,अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे उपस्थित होते .

यावेळी अनेक मान्यवरांनी सांगितले की, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या विकास कामावर जनतेचा पूर्णपणे विश्‍वास असून यांच्याकडून भविष्यात विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. शहाजीबापूंचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना समर्थ साथ देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना अजनाळे गणातील गावातून मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन महायुतीच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर व युवावर्ग , महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.