*मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स महिलांनसाठी दागिनेचे सुंदर दालन : नगरसेविका सौ. राणीताई आनंदा माने*
सांगोला येथील मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स म्हणजे महिलांनसाठी दागिनेचे सुंदर दालन असल्याचे नूतन नगरसेविका सौ.राणीताई आनंदा माने यांनी सांगितले.
मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स शाखा सांगोला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चांदी पायल महोत्सव व नवनिर्वाचित महिला नगरसेविकांचा सन्मान सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात यशस्वीपणे पार पडला.
यावेळी नगरसेविका सौ.राणीताई माने यांनी रत्नपारखी हे नाव मंगळवेढा बरोबर सांगोला तालुक्यात ही हे नाव वेगवेगळ्या दागिनेच्या डिझाईन साठी प्रसिद्ध आहे प्रत्येक महिलांन कडून ऐकायला भेटत की रत्नपारखी ज्वेलर्स मध्ये दागिनेचे डिझाईन, शुद्धता ,विश्वास असे रत्नपारखी ज्वेलर्स ची ओळख आहे त्याच बरोबर सौ.राणीताई माने यांनी सांगितले मला प्रत्येक वर्षी महोत्सव मध्ये निमंत्रण असते आणि मी या महोत्सवाला उपस्थित असतो
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.या मंगल सोहळ्याचे उद्घाटन सांगोला नगरपालिका नूतन नगरसेविका सौ.राणीताई आनंदा माने यांच्या शुभहस्ते पार पडले.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.वैशाली विनोद घुगे मॅडम यांनी प्रमुख उपस्थित लाभली.
प्रमुख पाहुण्या सौ.वैशाली घुगे मॅडम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आम्ही सांगोला शहरात आल्या नंतर रत्नपारखी हे नाव खूप ऐकून होतो रत्नपारखी ज्वेलर्स मधून खरेदी ही आमची असते. विश्वास, उत्तम सेवा , गुणवत्ता आज ही तितकीच सुंदर आहे असे सांगत मन:पूर्वक कौतुक केले.
या कार्यक्रमात सांगोला नगरपालिकेतील नवनिर्वाचित महिला नगरसेविका वैशालीताई सतीश सावंत,गोदाबाई भरत बनसोडे,अशादेवी सोमेश्वर यावलकर ,छाया सूर्यकांत मेटकरी ,सीमा समाधान सरगर ,शोभा निवृत्ती फुले,श्रद्धा रविप्रकाश साबळे, दिव्यानी सौरभ दौंडे ,वैशाली सिद्धार्थ झपके, अनिता निलेश केदार यांचा मानाची शाल ,पुष्पगुच व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स चे मालक श्री.जयदीप रत्नपारखी यांनी केले त्यांनी रत्नपारखी ज्वेलर्सची परंपरा , ग्राहकांशी असलेले दृढ नाते तसेच चांदी पायल महोत्सवाची संकल्पना व वैशिष्ट्ये उपस्थितांना सांगितले.
चांदी पायल महोत्सव मध्ये मधुरा पायल,सेलम पायल ,आग्रा पायल, छुमछम पायल ,राजकोट पायल ,मोगल आझम पायल ,फॅन्सी पायल, तसेच विविध प्रकारचे आकर्षक फॅन्सी जोडवी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्याच बरोबर चांदी पायल ,सोने दागिने व 1ग्राम ज्वेलरी वर आकर्षक गिफ्टस देण्यात आल्यामुळे महिलावर्गसह ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदीचा लाभ घेतला.
ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसात व समाधानकारक खरेदीमुळे हा चांदी पायल महोत्सव अत्यंत यशस्वी ठरला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल शेजाळ यांनी केले.
