Breaking

Wednesday, 14 January 2026

सूर्योदय ग्रुपच्या वतीने उद्या दुपारी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन



सायंकाळी सूर्योदय बँक्वेट हॉलचेही होणार लोकार्पण      

 सांगोला शहरातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान सूर्योदय उद्योग समूहाचे वतीने करण्यात येणार असून दुपारी संपन्न होणार्‍या हळदीकुंकू समारंभामध्ये महिला नगरसेविकांचा सन्मान तर सायंकाळी संपन्न होणार्या बँक्वेट हॉलच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये सर्व पुरुष नगरसेवकांचा सन्मान संपन्न होणार आहे. )                     

सांगोला/प्रतिनिधी ः

संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये आर्थिक संस्थांच्या माध्यमातून सहकाराचे जाळे उभा करणारा आणि दुग्ध व्यवसायाबरोबरच मॉल,  वस्त्र निकेतन, फर्निचर सारख्या उद्योगातून तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून देणार्‍या सूर्योदय उद्योग समूहाच्या वतीने सांगोला शहरातील वाढेगाव रोडवरील सूर्योदय बँक्वेट हॉल परिसरात खास मकर संक्रांतीच्या सणानिमित्त सांगोला शहर आणि परिसरातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सांगोला शहरातील सर्व नूतन नगरसेविकांचा सन्मान  माननीय तहसीलदार बाळूताई भागवत मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन सौ अर्चनाताई इंगवले व  संचालिका सौ सुरेखाताई लवटे यांनी दिली.  सुमारे 43 शाखांच्या माध्यमातून कार्यरत असलेली एलकेपी मल्टीस्टेट शाखा सांगोला, सूर्योदय अर्बन आणि सूर्योदय अर्बन महिला शाखा सांगोला, सूर्योदय समूहातील दूध विभाग त्याचबरोबर सूर्योदय मॉल , वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉल यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ , गाणी तसेच विविध स्पर्धा याबरोबरच समाजातील यशस्वी आणि कर्तृत्वसंपन्न महिलांचे मार्गदर्शन देखील होणार आहे. यावेळी सांगोला शहरातील सर्व नवनिर्वाचित नगरसेविका सौ सुजाता केदार, सौ राणी माने, सौ छाया मेटकरी, सौ वैशाली सावंत, सौ आशादेवी यावलकर, सौ वैशाली झपके, सौ गोदाबाई बनसोडे, सौ शोभा फुले, सौ दिव्याराणी दौंडे ,सौ श्रद्धा साबळे, सौ सीमा सरगर, सौ अनिता केदार, तनुजा एरंडे  या मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सांगोला शहर आणि आजूबाजूच्या गावातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सूर्योदय महिला अर्बनच्या व्हाईस चेअरमन सौ ज्योतीताई भगत आणि संचालिका सौ मीनाक्षीताई दिघे यांनी केले आहे. तसेच सूर्योदय ग्रुपच्या वतीने मॉल परिसरात सर्व सोयींनी युक्त आणि अत्याधुनिक अशा सूर्योदय बँक्वेट हॉलची उभारणी केली असून त्याचेही लोकार्पण उद्याच सायंकाळी पाच वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार असल्याची माहिती सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली. सांगोला शहरांमध्ये प्रथमच अशा प्रकारचा बँक्वेट हॉल उपलब्ध झाला असून भोजन व्यवस्थेसह उत्कृष्ट साऊंड सिस्टिम , लाईट इफेक्ट आणि संपूर्ण एसी सुविधा असलेला सूर्योदय हॉल लग्न समारंभ, साखरपुडा , वाढदिवस, बारसे ,विविध कंपन्यांचे सेमिनार, प्रशिक्षण शिबिरे यासाठी अत्यंत सोयीचा आहे. या कार्यक्रमात सांगोला शहरातील सर्व नूतन नगरसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये नगराध्यक्ष माननीय आनंदभाऊ माने, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, नगरसेवक रमेश जाधव, माऊली तेली, जुबेर मुजावर, प्रशांत धनवजीर, काशिलिंग गावडे, अरुण पाटील, विवेक पाटील, चैतन्य राऊत, गणेश बनकर, मदने मेंबर, विजय इंगोले इत्यादी मान्यवरांचा सन्मान सूर्योदय ग्रुपच्या वतीने करण्यात येणार आहे. सूर्योदय बँक्वेट हॉलच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक सर्वश्री जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ बंडोपंत लवटे आणि सुभाष दिघे गुरुजी यांनी केले आहे.