51अभ्यासकांनी घेतला सहभाग
कोळा/:
एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मध संचालनालय अंतर्गत मा. जिल्हाधिकारी सो. सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तावित मधाचे गाव ग्रामपंचायत कोळे यांच्या वतीने महाबळेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध मधाचे गावमांघर येथे 5 जानेवारी 2026 रोजी अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौर्यात मध, कृषी उत्पादन आणि ग्रामीण पर्यटन व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायतसदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी,बचत गटातील महिला सदस्य असे 51 अभ्यासकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. यावेळी मांघर येथील मधु पर्यटन समितीचे अध्यक्ष महादेव (नाना) जाधव यांनी सन 1955 ते 16 मे 2022 पर्यंत महाराष्ट्र सरकार कडून देशातील पहिले मधाचे गाव मांघर घोषित होईपर्यंतचा प्रवास थोडक्यात सांगितला.यामध्ये गावाची प्रमुख वैशिष्ट्ये, गावातील प्रमुख पिके,गावाला आतापर्यंत मिळालेले पुरस्कार याबद्दल सविस्तरमाहिती दिली. ग्रामीण भागातील पर्यटन संधी आणि स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी या अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. मांघर हे देशातील पहिले मधाचे गावम्हणून ओळखले जाते.या ठिकाणी राबविण्यात आलेले उपक्रम, मधाचे उत्पादन, प्रक्रिया आणि पर्यटनाच्या माध्यमातून गावकर्यांनी मिळवलेला रोजगार यांचा प्रत्यक्ष अनुभव अभ्यासकांनीघेतला. यानंतर महाबळेश्वर मध उत्पादक सहकारी सोसायटी मधुसागरला भेट देवून तेथील कार्यपद्धती, व्यवस्थापन, प्रक्रिया युनिट व उत्पादने आणि विक्री व्यवस्थापनइत्यादींची विक्री केंद्राला भेट देऊन अभ्यासकांनी माहिती जाणून घेतली. यानंतर खादी ग्रामोद्योगचे संचालक नारायणकर साहेब व खाडे साहेब व पलवेंचा साहेब यांनी अभ्यासकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पर्यटन आणि स्थानिक उत्पादनांची सांगड घातल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी क्रांती होऊ शकते. कोळा गावातील तरुणांनी आणि महिलांनी अशा प्रकल्पांतून प्रेरणा घेऊन स्वयंरोजगाराकडे वळावेहाच या दौर्याचा मुख्य उद्देश आहे असे सांगितले . यावेळी कोळा गावच्या सरपंच सौ. कविता आलदर व ग्रामपंचायत अधिकारी एस आर मोहिते, पी. पलवेंचा साहेब, डी. खाडे साहेब यांनीखादी ग्रामोद्योगचे संचालक आर. बी. नारायणकर साहेब यांच्याकडे कोळे मधाचे गाव योजनेचा प्रकल्प अहवाल सादर केला. दिवसभर चाललेल्या या दौर्यात अभ्यासकांनी मधमाशा पालन, मधाचे संकलन,पॅकेजिंग आणि मधमाशांमुळे पिकांच्या उत्पन्नात होणारी वाढ तसेच मधमाशीचे प्रकार, मधुबन, सेंद्रिय मध उत्पादन आणि उपयोगात येणारी सर्व साधने याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच मांघरमधील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांनी पर्यटनाचा विकास कसा केला, हे समजून घेतले. या दौर्यामुळे कोळा गावामध्ये नवनवीन उपक्रम राबवण्यास मोठी मदत होईलअसा विश्वास सहभागी सदस्यांनी व्यक्त केला.
