कळंब ( प्रतिनिधी)
-तालुका पत्रकार संघाचे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यावर्षी शहाजी चव्हाण यांच्या तूळजाई प्रतिष्ठान या संस्थेलासमाजसेवेसाठी, तर पत्रकारिते साठी दिल्ली येथीलनिलेशकुमार कुलकर्णी, सांगोला येथीलराजेंद्र यादव, शिरीष रणदिवे, निळकंठ कांबळे तर आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारईटकुर जिल्हा परिषद शाळेतीलअनिल शिंदे याना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराचे हे 27 वे वर्ष आहे. फेब्रुवारी मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली.
कळंब तालुका पत्रकारसंघाच्या सदस्यांचीबैठक पत्रकार भवन येथे अशोक शिंदे यांच्या अध्यक्ष ते खाली घेण्यात आली. या वेळी विविध विषयावर चर्चा करण्यात येवून , या वर्षी चे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
शि.म.ज्ञानदेव मोहेकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दिल्ली येथीलनिलेशकुमारकुलकर्णी,
*स्वा.सैनिक शिवशंकर बप्पा घोंगडे पत्रकारिता पुरस्कार - राजेंद्रयादव सांगोला, स्व.गणेश घोगरे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार - निळकंठ कांबळे उमरगा स्वा. सै.स्व. शकुंतलादेशपांडे समाज सेवा पुरस्कार - शहाजी चव्हाण यांची तळजाई प्रतिष्ठान, रा. ई. काकडेशोध पत्रकारिता पुरस्कार - शिरीष रणदिवे पुणे, स्व. सुधाकर सावळे उत्कृष्ट पत्रकार संघ पुरस्कार - येरमाळा पत्रकार संघ येरमाळा, स्व.के.ए.जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार अनिल शिंदे क्रीडा शिक्षक , यांना पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी जाहीर केले.
फेब्रुवारीत होणार्या कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पत्रकार संघाच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
