Breaking

Tuesday, 13 January 2026

सांगोल्यात 79 वी श्री अंबिकादेवी यात्रा उत्साहात; 19 ते 28 जानेवारीदरम्यान विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम

 



सांगोला / प्रतिनिधी

सांगोला शहराची आराध्य दैवत श्री अंबिकादेवी यांच्या 79 व्या यात्रेचे भव्य आयोजन श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती, सांगोला यांच्या वतीने करण्यात आले आहे. ही यात्रा दि. 19 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 या कालावधीत रथसप्तमीच्या पार्श्‍वभूमीवर पार पडणार असून, यंदा शेतीमालाचे प्रदर्शन, जनावरांचा बाजार, क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धा आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

यात्रेची सुरुवात दि. 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता श्री देवींच्या सवाद्य मिरवणुकीने होणार आहे. दि. 20 व 21 जानेवारी रोजी शेळ्या-मेंढ्या व सर्व जनावरांचा व बैलांचा बाजार भरणार आहे. दि. 22 जानेवारी रोजी खिलार जनावरांचे प्रदर्शन, तर दि. 23 व 24 जानेवारी रोजी सर्व प्रकारचा बाजार व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 25 जानेवारी रोजी रथसप्तमी निमित्त महापूजा, महानैवेद्य व रात्री 9 वाजता भजनाचा कार्यक्रम होईल. दि. 26 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता शेतीमालाची निवड, तर दि. 28 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता बक्षीस समारंभ आणि सायंकाळी 7 वाजता शोभेचे दारुकाम होणार आहे. याच दिवशी श्री अंबिकादेवी पालखीची यात्रेतून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

यात्रेदरम्यान रंगभरण, चित्रकला, ठिपक्यांची रांगोळी, संस्कार भारती अशा स्पर्धांसह मिनी मॅरेथॉन (3 किमी व 5 किमी) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विविध गटांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच सांगोला व परिसरातील अनेक महिला भजनी मंडळांचे भव्य भजन कार्यक्रम भाविकांचे लक्ष वेधणार आहेत.

व्यापार्‍यांसाठी जागा वाटपाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यात्रा परिसरात शिस्त व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन समिती