कोळा वार्ताहार
जुजारपूर गावचे सुपुत्र मुंबई शहरामध्ये ट्रान्सपोर्ट क्षेत्रात मोठे नाव केलेले उद्योजक सोमनाथ माने यांचे चिरंजीव ओम व कन्या तेजल माने यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून माने परिवाराने या भागातील सर्व कुटुंबांना गोरगरिबांना थंडीच्या काळामध्ये हजारो ब्लँकेटचे वाटप करून केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे विचार सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
जुजारपूर ता सांगोला येथे उद्योजक सोमनाथ माने यांचे चिरंजीव ओम व कन्या तेजल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लँकेट वाटपाचे सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्यासपीठावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर माजी जिल्हा परिषद गजेंद्र कोळेकर युवा नेते अमृत पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. आ बाबासाहेब देशमुख यांचा सन्मानपूर्वक शाल श्रीफळ भेटातो देऊन माने परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व नेते मंडळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आ बाबासाहेब देशमुख म्हणाले माने जिल्ह्याचे शेवटचे गाव असलेल्या जुजारपूर या भागांमध्ये परंपरेने दुष्काळी पट्टा असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी असंख्य लोक मुंबईत असायची यामध्ये काही कै नारायण बापू पण होते स्वतःच्या कष्टावरती कर्तुत्व सिद्ध करून त्यांच्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार दिले यामध्ये माझे जवळचे घनिष्ठ मित्र उद्योजक सोमनाथ शेठ माने यांनी ट्रान्सपोर्ट क्षेत्रात च्या माध्यमातून तरुण व गरजू सहकार्यांना स्वतःच्या संसारासाठी काम मिळवून दिले आणि या भागात आपल्या जन्मभूमीच आपण काय तर देणं लागतो या उद्देशाने त्यांनी चांगले कार्य केले सर्वसामान्यासाठी हा विचार समोर ठेवून गोरगरिबांना थंडीच्या काळामध्ये ब्लँकेटचे वाटप करून त्यांच्या हातून समाजसेवा घडली अभिमानाची बाब आहे आपल्या हातून सामाजिक कार्यातून सर्वसामान्यांना मदत मिळावी या सदिच्छा आहेत. मुलगा ओम व कन्या तेजल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो असे आ देशमुख यांनी शेवटी सांगितले.भाई गजेंद्र कोळेकर म्हणाले माने कुटुंबियाने आपल्या भागातील कामाच्या माध्यमातून त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आहे असे अनेक तरुण त्यांच्यामुळे पुढे आले आहेत असे सांगितले.यावेळी उद्योजक श्रीमंत सरगर म्हणाले माझे जवळचे मित्र सोमनाथ माने यांनी सर्वसामान्य लोकांसाठी ब्लँकेट वाटप करून एक चांगले काम अभिमान गौरवास्पद काम केले आहे.
या कार्यक्रमास उद्योजक श्रीमंत सरगर, युवा नेते किरण भाऊ पांढरे, पत्रकार जगदीश कुलकर्णी, सोमनाथ माने, पांडुरंग वाघमोडे, दत्ता वाघमोडे, राजाभाऊ पाटील, बाळासाहेब पाटील, सदा कारंडे (पोलिस पाटील), दत्ता लोखंडे, भारत खरात विनायक होनमाने सरपंच पवन गाडे सुखदेव पाटील ज्येष्ठ भोला पाटील नामदेव आलदर नारायण माळी अण्णा गडदे गजानन हिप्परकर बिरुदेव चौगुले पिंटू माने, समाजसेवक दासु माने यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ शेठ माने मित्रपरिवार सरपंच पवन गाडे उपसरपंच श्रावण वाघमोडे समाजसेवक पिंटु (भाऊ) माने यांच्यासह सर्व नेतेमंडळी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. ब्लँकेट घेण्यासाठी ग्रामस्थांनी नागरिकांनी महिला वर्गांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योजक सोमनाथ माने आभार नारायण माळी सर पवन गाडे यांनी मानले.
