Breaking

Tuesday, 30 December 2025

वीरशैव लिंगायत तेली समाजाचा कार्यक्रम जिव्हाळाच्या, हृदय स्पर्शी- मा.आ.शहाजीबापू पाटील

 


वीरशैव लिंगायत तेली समाजाकडून आनंदा माने यांच्यासह नूतन नगरसेवकांचा सत्कार संपन्न 

सांगोला(प्रतिनिधी):



-समाज जरी लहान असला तरी छोटा समजण्याची चूक करू नका.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुध्दा तेली समाजाचे आहे हे विसरू नका. निवडणुकीत जातीचे, समाजाची गणित मांडली जातात हा लोकशाहीचा सर्वात मोठा पराभव आहे. सर्वांनीच असे केले तर लहान

समाजाला केव्हा न्याय मिळणार असा सवाल उपस्थित करुन आजचा वीरशैव लिंगायत तेली समाजाचा कार्यक्रम जिव्हाळाच्या, हृदय स्पर्शी कार्यक्रम झाला आहे.शहरातील जनतेला आमचा विचार आवडला. त्यामुळे आम्हाला मोठे यश मिळाले असून जनतेच्या आशीर्वादाला पात्र राहणार

असून जनतेच्या आशीर्वादानेच आनंदा भाऊ माने विजयी झाले आहेत.त्यामुळेच सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत लोकशाहीचा विजय झाला असून हाच विचार घेऊन पुढे जायचे असल्याचे मत मा.आ.अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

वीरशैव लिंगायत तेली समाज, सांगोला तालुक्याच्या वतीने सांगोला नगरपरिषदेत नुकत्याच निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार समारंभ रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता सांगोला शहरातील पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.यावेळी माजी आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते. 

व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ,माजी उपनगराध्यक्षा सौ. छायाताई तेली, गिरीषभाऊ नष्टे, आनंद घोंगडे, महेश गुळमिरे, संदेश पलसे, संतोष महिमकर, अस्मिर तांबोळी यांच्यासह लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने, माऊली तेली, प्रशांत धनवजीर, नितीन इंगोले, इंजि.रमेश जाधव, चैतन्य राऊत, काशिलिंग गावडे, विवेक पाटील, अरुण पाटील, रामचंद्र मदने, गणेश बनकर, नगरसेविका सौ.राणीताई माने,सौ.आशादेवी यावलकर सौ. छायाताई मेटकरी, सौ.सीमाताई सरगर, सौ.वैशाली सावंत, सौ.अनिताताई केदार, सौ.श्रद्धा साबळे, सौ.दिव्यांनी दौंडे, गोदाबाई बनसोडे, कवयित्री सौ.सुवर्णा तेली, हर्षदा गुळमिरे उपस्थित होते.

पुढे बोलताना मा.आ.शहाजीबापू पाटील म्हणाले, काही समाज छोटे जरी असले तरी त्या समाजाला सत्तेच्या प्रवाहात संधी दिली पाहिजे. ती संधी सांगोल्यातील नागरिकांनी धनगर समाजाला नगराध्यक्ष व तेली समाजाचा नगरसेवक दिला त्यामुळे लोकशाही जीवंत असल्याचे द्योतक उदाहरण आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या कालावधीत जे शब्द आपण सर्वांनी दिले आहेत ते पहिल्या 2 वर्षात पूर्ण करून पुढची 3 वर्षे भव्य दिव्य स्वप्ने बघुन ती पुर्ण करुन पश्‍चिम महाराष्ट्र सर्वात भव्य दिव्य नगरपालिकेसाठी आपण सर्वांनी ही जबाबदारी पार पाडूया असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाप्रसंगी तेली समाज बांधव तसेच शहरातील नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माऊली तेली मित्रपरिवारांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने, प्रशांत तेली व सौ.संध्या बोचरे तेली यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक सुनीलदत्त कोरे यांनी, सूत्र संचालन भीमाशंकर पैलवान यांनी तर आभार तेजस तेली यांनी मानले.