सांगोला/प्रतिनिधी :
आज सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार म्हणून उभे असणारे विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके यांनी
माळवाडी, लांडगे माळा, राऊत मळा , फुले माळा, तळ्यातला राऊतमाळा, चांडोलवाडी, देशमुख मळा , लिंगे वस्ती, जाधव वस्ती, बंनकर वस्ती या भागात भेट देत प्रचाराचा धुमधडाका उडवला आहे. घरोघरी प्रत्यक्ष मतदारांना भेटून या पुढील काळातील आपण करणार्या गोष्टींची माहिती देत विश्वेश झपके व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार जोमाने केला आहे.
सांगोला नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली आहे. आज सर्व अपक्ष उमेदवारांना तसेच राष्ट्रीय पक्षातील उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.राष्ट्रीय पक्षातील चिन्हे ठरलेले आहेत, मात्र अपक्ष उमेदवारांना कोणतं चिन्ह मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.भाजप, शेतकरी कामगार पक्ष व दीपक आबा साळुंखे पाटील यांचा गट एका बाजूला तर शिवसेना एका बाजूला आणि या सर्वांमध्ये लक्षवेधी ठरत असलेले अपक्ष उमेदवार विश्वेश झपके एका बाजूला अशी तिरंगी लढी सांगोल्यात पाहायला मिळते. सर्व उमेदवारांची प्रचारामध्ये चुरस लागली असून नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीमध्ये अपक्ष उमेदवारच बाजी मारेल अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
रोजच्या रोज कोणत्या वार्डाला कोणी कशा पद्धतीने भेटी द्यायच्या याचे नियोजन पक्षप्रमुख व त्यांचे जवळचे कार्यकर्ते करत आहेत. आपल्या आश्वासनाचा अजेंडा घेत आपण कोणते काम करणारंनी आहोत.आपण कोणते काम केले आहे आणि आमचा पक्ष कशा पद्धतीने श्रेष्ठ आहे या सगळ्या संकल्पनांना मतदारांसमोर नेतेमंडळी मांडताना दिसत आहेत. या सगळ्यांमध्ये ज्यांच्या उमेदवारीने सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे ते अपक्ष उमेदवार म्हणजे विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके यांनी प्रचारामध्ये विशेष आघाडी घेतल्याने सगळीकडे वातावरण बदलू लागले आहे.
विविध पक्षांनी दुखवलेली मंडळी अपक्षांच्या साथीला येऊन मिळत आहेत त्यामुळे अपक्ष उमेदवाराचे पक्षबळ वाढत आहे.
सदरची निवडणूक मी शहराच्या विकासाचे स्वप्न घेऊन लढत आहे.मूलभूत गरजांसाठी नागरिकांना करावा लागणार संघर्ष या निवडणुकीच्या माध्यमातून मी संपवणार आहे. राज्यात विविध ठिकाणी असणार्या नगर परिषदेमध्ये जो स्वच्छ व पारदर्शक कारभार केला जातो तशा पद्धतीचा कारभार सांगोला नगर परिषदेमध्ये आपणास यापुढील काळात दिसेल. यासाठी तुम्ही मला साथ द्या मी शहराच्या विकासाचे नवे रूप सिद्ध करतो.
विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार
