Breaking

Sunday, 23 November 2025

पैशापेक्षा मनाची श्रीमंती मोठी असते; बापू तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है: उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

 

सांगोला नगरपालिकेच्या माध्यमातून विकासाचे तोरण हेच आमचे धोरण; 

समोरच्याचा निकाल लागेपर्यंत मतदारांनी  झोपू नये.

*आनंदाभाऊ माने हे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे 23 उमेदवार असले तरी खरी लढाई ही बापूंचीच आहे. 




सांगोला प्रतिनिधी 

 सांगोला नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी आनंदाभाऊ माने व नगरसेवक पदासाठी 23 उमेदवार निवडणूक लढवणार असून सांगोल्यात शिवसेनेच्या धनुष्यबाणाची टीम चांगली आहे. नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. सांगोल्यातील लोकांच्या मनात असंतोष आहे. मतदानाच्या माध्यमातून समोरच्याचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही. सर्वजण बापूंच्या प्रेमापोटी सभेसाठी आले आहेत. येथे कोणी भाड्याने आले नाही. सांगोला तालुक्याला कधी नव्हे तो भरपूर विकास निधी दिला आहे. शहराच्या विकासासाठी 200 कोटी निधी दिला. त्यातून अनेक कामे मार्गी लागली. आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे अशी बापूंची भूमिका असते. सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारा हा एकनाथ शिंदे जनतेच्या पाठीशी आहे. बापू तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा केली. सांगोला नगरपालिकेच्या विकासाचे तोरण हेच आमचे दीर्घकालीन धोरण असल्याचे विचार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांनी सांगोला येथे व्यक्त केले .

सांगोला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाचे 23 असे एकूण 24 उमेदवार निवडणूक लढवीत असून त्यांच्या प्रचारार्थ रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते. 

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी व शहाजीबापू पाटील हे जनतेला दिलेला शब्द पाळणारे नेते आहोत. 2 तारखेला होणार्‍या मतदाना दिवशी सर्वांनी धनुष्यबाणावरती मतदान करून नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उभे असलेल्या सर्व उमेदवारांना विजयी करा. सांगोला नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा लागला पाहिजे याची दक्षता घ्या. सांगोला नगरपालिकेसाठी मतदारांचा कौल हा शिवसेनेच्या बाजूने असणार आहे. बापूंनी केलेला विकास समोर ठेवून सर्वांनी बापूंना साथ द्यावी. एका शेतकरी कुटुंबातील मुलाने राज्याचा मुख्यमंत्री होऊन गोरगरिबांना खर्‍या अर्थाने न्याय दिला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेपर्यंत चालू राहणार आहे. सांगोला तालुक्याच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या योजना बापूंनी मार्गी लावल्या.  सांगोला शहर व तालुक्यातील रस्त्यासाठी 80 कोटीची मागणी केली आहे. त्याची पूर्तता लवकरच करू असे आश्‍वासन ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. एसटीमध्ये प्रवाशांना 50% सवलत, मुलींना उच्च शिक्षण मोफत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला 232 जागा मिळवून दिल्या. माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर व बापू निस्वार्थीपणे एकत्र आले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी बापूंना फसवल्यामुळे येथील जनता तुम्हाला आता माफ करणार नाही. 2 डिसेंबरपर्यंत डोळ्यात तेल घालून निवडणुकीत काम करा. बापू तुमच्यासाठी आयुष्यभर काम करतील. समोरच्याचा निकाल लागेपर्यंत कोणीही झोपू नका. बापू शब्दाला पक्के असून आनंदा माने यांच्यासह सर्व शिवसेना पॅनलला विजयी करा .गुलाल हा आपलाच आहे. जनता हीच खरी आमची ताकद आहे असे विचार मांडले.

यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने ,  शितल लादे, माजी नगरसेवक प्रा. संजय देशमुख, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदाभाऊ माने, नितीन इंगवले , शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी मनोगतातून सांगितले की, सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी आनंदाभाऊ माने व नगरसेवक पदासाठी 23 उमेदवार निवडणूक लढवत असून धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून या सर्व शिवसेना पॅनलला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. 2016 च्या निवडणुकीनंतर नगराध्यक्षाच्या 15 टक्के निधीतून शहरातील विकास कामे मोठ्या प्रमाणावर मार्गी लागली. भविष्यात आनंदामाने नगराध्यक्ष झाल्यानंतर  त्यांच्या टीमला सोबत घेऊन शहरातील सर्वच प्रश्‍न मार्गी लावतील. नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष, नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना विजयी करून एक हाती सत्ता देऊन शहराचा विकास पहा. सांगोला शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समर्थ साथ द्या असे आवाहन अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद घोंगडे यांनी केले.


 सांगोला नगरपालिका निवडणुक स्वाभिमानाची आहे. सांगोला तालुक्यावर गुलामगिरीची वेळ आली आहे. स्व. गणपतराव देशमुख व माजी आमदार शहाजीबापूंनी तालुक्याचा स्वाभिमान कधीही गहाण ठेवला नाही. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मारुतीआबा बनकर यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली. पुन्हा आघाडीकडून मारुतीआबा बनकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी  घोषित केली. त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून आनंदा माने यांची उमेदवारी जाहीर केली .उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला शहराच्या विकासासाठी तब्बल 200 कोटी निधी दिला. त्यांचे उपकार आपण मतदानाद्वारे फेडावेत .विधानसभा निवडणुकीसाठी माझ्या पराभवासाठी रचना केली होती. पैशावर सांगोला तालुका विकत घेऊ नका. तालुक्याच्या राजाला भीक वाढता काय?  स्व. गणपतराव देशमुख व शहाजीबापू पाटील  यांनी सांगोला तालुक्याचा स्वाभिमान राखला आहे. तुम्ही युती तोडली त्यामुळे जनता नाराज आहे. सांगोला नगरपालिका निवडणूक ही खर्‍या अर्थाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अस्मितेची आहे.

: माजी आम. अ‍ॅड. शहाजीबापू पाटील 

 सांगोला नगरपालिकेच्या ऐतिहासिक निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्षपदासह 23 नगरसेवक पदाचे उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. बापूंच्या पाठीशी तालुक्यातील जनता आहे. नगराध्यक्षपदासाठी आनंदा मानेंचे नाव कार्यकर्तुत्वामुळे  चर्चेत आहे. नगराध्यक्षा राणीताई माने वआनंदाभाऊ माने यांच्या कार्यकाळात भुयारी गटारीचा प्रश्‍न मार्गी लावला. बापू म्हणजे नेते तयार करणारी मोठी कंपनी आहे  

-:  दादासाहेब लवटे, शिवसेना तालुकाप्रमुख. 


 2016 साली नगरपालिकेची निवडणूक झाली .त्यावेळी शेकाप,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस एकत्र येऊन सांगोला शहर विकास आघाडी स्थापन केली होती. त्यावेळी शहाजीबापू पाटील यांनी महायुती स्थापन करून नगरपालिका निवडणुकीत आठ नगरसेवकासह नगराध्यक्षपद प्राप्त केले होते. परंतु विरोधकाकडे बहुमत असल्याने लोकनियुक्त नगराध्यक्षाच्या कार्यकाळात विरोधकांनी शहराच्या विकासाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी व ठराव नामंजूर करण्यासाठी मोठी अडचण केली. मा.आम शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकीत  24 उमेदवार निवडून येतील 

 : माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ 

 बापूंच्या नेतृत्वाखाली 2016 ची नगरपालिका निवडणूक यशस्वी झाली. सांगोला नगरविकास आघाडीकडे बहुमत होते. बहुमताच्या जोरावर विरोधकांनी विकास कामे रोखली. परंतु यावेळी नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्ह असून नगराध्यक्ष व नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा .माजी आमदार शहाजीबापू पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार आहेत. आम्हाला नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने बहुमत द्या.  शहराच्या विकासासाठी आमच्या एकहाती सत्ता द्या. भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका कारभार करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा

: आनंदाभाऊ माने, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार


 2016 च्या निवडणुकीनंतर विकास कामांमध्ये अनेक अडचणी आल्या. नगराध्यक्षांच्या 15% निधीतून शहरातील विकासकामे मार्गी लावली. दरम्यानच्या काळात कोरोना आजार आल्याने लोकांना सुरक्षित जीवन जगण्यासाठी मदत केली. त्यावेळी खूप काळ यामध्ये गेला. त्यामुळे विकासासाठी आमची तळमळ असूनही मागे राहिलो. या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडून 24 उमेदवार उभे असून सर्वच उमेदवारांना बहुमताने विजयी करा: 

सौ.राणीताई माने, माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा

सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेने शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासह 23 नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी ग्रामदैवत अंबिकामातेचे दर्शन घेऊन शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करीत नगरपालिका निवडणुकीतील  शिवसेना उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार यांचे रॅलीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाहीर सभेच्या ठिकाणी  आगमन झाले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी आमदार शहाजीबापू पाटील व अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवसेनेकडून निवडणूक लढवणार्‍या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेनेचे नेते साईनाथ अभंगराव, विजय दादा शिंदे दिग्विजयदादा पाटील, सोलापूर जिल्हा युवासेना संपर्कप्रमुख सागरदादा पाटील, यांच्यासह शहरातील युवावर्ग महिला भगिनी व मतदार यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.