Breaking

Friday, 3 October 2025

स्वच्छ सुंदर समृद्ध गावासाठी ग्रामस्थांची लोक चळवळीतून स्वच्छता मोहीम

 सांगोला/प्रतिनिधी ः 



सांगोला तालुक्यातील पारे या गावांमध्ये दोन ऑक्टोंबर महात्मा गांधीजी जयंतीचे औचित्य साधून दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर ग्रामपंचायत पारे यांचा अभिनव उपक्रम. मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत संपूर्ण गावांमध्ये सर्व चौक सर्व रस्ते सार्वजनिक ठिकाणी प्रशासकीय इमारती अशा अनेक भागात गावातील ग्रामस्थांनी स्वच्छता मोहीम मध्ये श्रमदानाच्या स्वरूपातून सहभाग घेऊन आपले गाव स्वच्छ सुंदर व समृद्ध बनविण्यासाठी जणू या गावाने विडा उचलला आहे असे चित्र दिसत आहे महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून पारे गावातील सर्व ग्रामस्थ या स्वच्छता अभियानाच्या दिंडीला आपल्या हातामध्ये झाडू पाट्या कचरा गाड्या अशा अनेक पद्धतीच्या श्रमदानाच्या स्वरूपातून दिवसभरामध्ये स्वच्छता अभियान राबवित असताना त्यांनी व्यापारी वर्गांना आपला कचरा इतर टाकू नये कचरासाठी कचराकुंडीचा वापर करावा सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता व परिसर हे आपण सुज्ञ नागरिक म्हणून ठेवले पाहिजे या हेतूने सर्व ग्रामस्थांनी लोक चळवळीच्या माध्यमातून सुंदर गाव स्वच्छ गाव बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे यातूनच दिवसभरामध्ये स्वच्छतेची मोहीम ग्राम संघ महिला कार्यालय छत्रपती शिवाजी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक ग्रामपंचायत चौक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशा अनेक ठिकाणी श्रमदानाच्या रूपाने स्वच्छता राबवली यामुळे भविष्यासाठी आपले गाव स्वच्छ समृद्ध सुंदर बनवण्यासाठी ही मोहीम सातत्याने चालू राहणार आहे यासाठी पारेगाव चे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य युवक नागरिक व प्रशासकीय अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी सर्वांनी मनापासून यामध्ये भाग घेऊन आपले गाव स्वच्छ केलेले आहे व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे महत्व घरोघरी पोहोचवली आहे त्यामुळे या गावांमध्ये सध्या सुरू असलेले मुख्यमंत्री पंचायत राज अभियान प्रभावीपणे होम टू होम सुरू असून यातून आपल्या गावाचा चेहरा मोहरा बदलताना दिसत आहे यामुळे या गावाला स्वच्छ सुंदर व हरित गाव लवकरात लवकर करण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत असे दिसून आले

एक आगळा वेगळा वाढदिवस गावकर्‍यांनी अनुभवला

संपूर्ण महाराष्ट्रभर गावागावात राबवीत असलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे सुरू असताना पारे गावाचे मा.सरपंच तथा विद्यमान उपसरपंच संतोष पाटील यांनी आपले गाव स्वच्छ समृद्ध व हरित गाव करण्यासाठी अभियान मध्ये गेली सातत्याने सतरा सप्टेंबर पासून आपल्या गावात घरोघरी जाऊन अभियानाची माहिती देत असलेले व स्वच्छताच्या रूपाने गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी रात्रंदिवस झटत असलेले आपल्या गावाचे नाव राज्यामध्ये लौकिक होण्यासाठी प्रयत्नशील असलेले पाटील यांनी आपला वाढदिवस 2 ऑक्टोबरची अवचिते साधून रात्रीच्या बारा वाजल्यापासून पारी येथील स्मशानभूमीत स्वतः मित्रांच्या मदतीने स्वच्छता अभियानाला सुरुवात केली असून त्यांनी आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना सर्वांना विनंती केली कोणी हार तुरे फेटा न आणता आपण स्वच्छता अभियानामध्ये सामील व्हावं व आपला परिसर स्वच्छ करावा त्याचबरोबर प्रत्येकाने वृक्षारोपण करावे अशी विनंती गावकर्‍यांना केली व ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरू असलेल्या अभियानामध्ये स्वच्छता मोहीम मध्ये त्यांनी स्वतः दिवसभर श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान भाग घेऊन एक वेगळा आदर्श समाजाला दाखवून दिला आहे व वाढदिवसाचा बॅनर लावण्याचे टाळून मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या जाहिरातीचा बॅनर दर्शनीय चौकात लावून एक वेगळी कल्पकता केली .अशा कर्तबगार नेत्यांची आज समाजाला गरज आहे कारण प्रत्यक्ष आपल्या वाढदिवसा पेक्षा आपल्या गावाची स्वच्छता महत्वाची आहे हे पटवून देऊन त्याने एक वेगळा आदर्श राज्य पुढे ठेवलेला  दिसून येतो. अशा गावाला प्रगतीपथावर नेण्यासाठी गावागावातील पदाधिकारी यांनी हे कर्तव्य पार पडले तर शंभर टक्के महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायला वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया गावकर्‍यांनी व्यक्त केली .