शिवशक्ती महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सांगोला या संस्थेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
सांगोला/ प्रतिनिधी -
सांगोला येथील शांताराम साधू सुरवसे व परिवाराने चांगल्या प्रकारे शेती व्यवसाय करीत उद्योग क्षेत्रामध्ये धाडसाने पाऊल टाकत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. हॉटेल शिवशक्ती, शिवशक्ती मल्टीपर्पज हॉल, शिवशक्ती लाईट हाऊस या उद्योग व्यवसायात ग्राहकांना चांगली सेवा देत उन्नती केली आहे. शिवशक्ती महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला या संस्थेची स्थापना करून महिलांच्या हाती पतसंस्थेचा कारभार सोपवला आहे. सांगोल्यात खूप मोठ्या प्रमाणावर कर्तबगार माणसं जन्माला आली आहेत. त्यामुळे सांगोल्याचा इतिहास लिहिला जाईल. साळुंखे पाटील परिवाराचे व सुरवसे परिवाराचे जिव्हाळ्याचे नाते आहे. माणूस स्वकृत्वाने पुढे जातो हे शांताराम साधू सुरवसे यांच्या उल्लेखनीय कार्यातून पाहायला मिळते. शांताराम साधू सुरवसे व परिवाराचे शेती क्षेत्राबरोबर उद्योग व्यवसायातील कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी आम. दीपक आबा साळुंखे पाटील यांनी सांगोला येथे केले.
शिवशक्ती महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला या संस्थेचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी माजी आम. दीपकआबा साळुंखे पाटील, शिवणे मठाचे शिवदास घाडगे महाराज, शांताराम सुरवसे, सिंधू सुरवसे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमप्रसंगी माजी आम. दीपकआबा साळुंखे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव ,डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ,माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत, शिवसेना युवा जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील ,शिवसेनेचे युवा नेते गुंडादादा खटकाळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंदभाऊ केदार, उद्योगपती योगेशदादा खटकाळे, इब्राहिम मणेरी, दिगंबर गोरे, संजय पवार बिभिशन नाईक नवरे, उद्योगपती प्रताप इंगवले, सिताराम सुरवशे, रमेश सुरवसे यांच्यासह शिवशक्ती महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला या संस्थेच्या चेअरमन सविता सुरवसे ,व्हा. चेअरमन संगीता भोसले, संचालक सुषमा गायकवाड ,अश्विनी भोसले, उज्वला कोळेकर ,राजश्री भोसले, आयेशा मुलाणी ,शितल केदार, मनीषा सुरवसे, सुनिता सराटे, गायत्री गोरे, आरती लिगाडे, राणी सुरवसे, स्वप्नाली केदार, कविता खराडे व या संस्थेचा कर्मचारी वृंद तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर ,युवावर्ग व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, या शिवशक्ती महिला संस्थेच्या माध्यमातून महिला कारभार पाहणार असून महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिल्यास संस्थेला निश्चितपणे चांगली प्रगती साधता येईल व भाग भांडवलही जमा होईल. महिला बचत गट धाडसाने कर्ज काढतात व पुन्हा त्याची परतफेड ही करतात. त्यामुळे बचत गटांना दिलेले कर्ज निश्चितपणे परतफेड होते. भविष्यात या संस्थेचा कार्यविस्तार जिल्हाभर व्हावा अशा सदिच्छा व्यक्त केल्या .
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंदभाऊ केदार म्हणाले, सुरवसे परिवाराचे उद्योग व्यवसायातील स्थान महत्त्वाचे असून त्यांनी आजपर्यंत सुरू केलेल्या प्रत्येक उद्योग व्यवसायातून चांगला विकास साधला आहे .या संस्थेच्या माध्यमातून सुरवसे कुटुंबीय निश्चितपणे चांगला कारभार करून संस्था नावारूपाला आणतील त्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे निवेदक म्हणून राहुल बजरंग बाबर चोपडी यांनी धुरा सांभाळली. उपस्थितांचे स्वागत शिवशक्ती उद्योग समूहाचे संस्थापक शांताराम सुरवसे यांनी केले तर आभार सिताराम सुरवसे व रमेश सुरवसे यांनी मानले.

