Breaking

Saturday, 4 October 2025

श्रीराम गणेश मंडळाकडून आपत्तीग्रस्तांसाठी मदत

धान्य,किराणा, भांडी,किराणा व शैक्षणिक साहित्यासह 21 हजाराचा चेक प्रदान

सांगोला/प्रतिनिधी: 



सामाजिक कार्यात सहभाग नोंदविणारे सांगोला शहरातील श्रीराम तरुण गणेश मंडळ व शहर वासियांकडून आपत्तीग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा म्हणून धान्यादी वस्तूं,कपडे, भांडी ,सध्या व शालेय साहित्यासह 21 हजार रुपयांची मदत देण्यात आली.सदरची मदत शनिवार दि.3 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आपत्तीग्रस्त मदत विभागाकडे सुपूर्त करण्यात आली.यावेळी मदत कक्षाचे नोडल ऑफिसर,कर्मचारी, मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थिती मध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा, मोहळ, करमाळा, अक्कलकोट,दक्षिण व उत्तर सोलापूर आणि सांगोला तालुक्यातील काही गावांमध्ये शेती पिके,फळबागा व वास्तूसह राहती घरे वाहून गेली.त्यामुळे जीवित व वित्त मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने संपूर्ण राज्यात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

यासाठी राज्यातून अनेक संस्था, तीर्थक्षेत्र,संघटना व नागरिकांकडून मदतीचा हात पुढे झाला आहे.सांगोला तालुक्यातून देखील विविध संस्थानी मदत देण्याचे काम केले आहे.सांगोला शहरातील श्रीराम तरुण गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील शहरातून सर्वांची मदत घेत आपत्तीग्रस्त कुटुंबासाठी गहू, तांदूळ, साखर, पावडर, पुरुष व मुलांसाठी नवीन कपडे, महिलांसाठी नव्या साड्या, भांडी,चादर,सतरंजी, रग, चटई शिक्षण घेणार्‍या मुलांसाठी वही,पेन, स्कूल बॅग इत्यादी साहित्य व 21 हजार रुपयांचा चेक अशाप्रकारची मदत जिल्हाधिकारी कार्यालय,सोलापूर येथे पोहोच केली आहे.