मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विशेष मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
अजनाळे प्रतिनिधी -
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत अजनाळे येथे दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी विशेष कर संकलन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून केवळ एका दिवसात घरपट्टी व पाणीपट्टी मिळून तब्बल 1,11,256 इतकी विक्रमी कर वसुली करण्यात आली आहे.
या मोहिमेदरम्यान ग्रामपंचायतीतर्फे विशेष प्रोत्साहनपर योजना राबविण्यात आली. ज्यामध्ये 2000 किंवा त्याहून अधिक कर भरलेल्या खातेदारांसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे. या लकी ड्रॉमध्ये प्रथम विजेत्यास 3000, द्वितीय विजेत्यास 2000 आणि तृतीय विजेत्यास 1000 अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या विशेष कर वसुली मोहिमेला विस्तार अधिकारी पुकळे, ग्रामपंचायत अधिकारी संदीप सरगर, सरपंच दीपाली लाडे, तसेच विजय येलपले, दत्तात्रय कोळवले, शरद येलपले, बाळासो लाडे, ग्रामपंचायत सदस्य महादेव भंडगे, मधुकर पुजारी, पूजा पोतदार, प्रशांत बनसोडे, संजय बनसोडे, महेश चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.फोटो
