प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्यावतीने मोफत कोर्स व 100% नोकरीची हमी
सांगोला/प्रतिनिधी :
सांगोला तालुक्यातील बेरोजगार युवक व युवतींसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने विविध कौशल्याधारित कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, या प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना 100% नोकरीची हमी देण्यात येत आहे.
तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या सदस्य व नोकरदार वर्ग यांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या गावातील गरजू व इच्छुक युवक-युवतींपर्यंत ही माहिती पोहोचवावी, जेणेकरून त्यांना आपल्या आयुष्याला नवीन दिशा देता येईल.
उपलब्ध कोर्सेस पुढीलप्रमाणे:
1. इलेक्ट्रिकल 2. टू व्हीलर मेकॅनिकल 3. फोर व्हीलर मेकॅनिकल 4. नर्सिंग (ॠऊ-) 5. हॉटेल मॅनेजमेंट व हॉस्पिटॅलिटी 6. प्लंबिंग 7. कन्ट्रक्शन 8. वेल्डिंग 9. ब्युटी पार्लर
या सर्व कोर्सेसमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी थेट संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळवण्यास मदत होणार असून, भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधीही प्राप्त होणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्यावतीने सांगोला तालुका समन्वयक बापूसाहेब ठोकळे यांनी केले आहे. संपर्क: बापूसाहेब ठोकळे, सांगोला मोबाईल क्र.: 9421041433
