सांगोला: प्रतिनिधी
तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात जगाला ऊर्जा, नवकल्पना आणि शाश्वत विकासाची दिशा देणारी शाखा म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. विद्युत शक्ती निर्मितीपासून ते स्मार्ट तंत्रज्ञानाच्या निर्मितीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात या शाखेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अशा या काळाची गरज ओळखून फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगोला येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि संशोधनाची संधी उपलब्ध करून देत असल्याचे असे मत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. संपत कुमार बोडापटला यांनी पञकारांशी संवाद साधताना मत व्यक्त केले.
फॅबटेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग केवळ अभ्यासक्रमापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देतो. अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, उद्योग क्षेत्राशी असलेला समन्वय आणि प्रत्यक्ष प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबत व्यावहारिक अनुभवही दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडविण्याची क्षमता, नवोपक्रमशील विचारसरणी आणि नेतृत्वगुण विकसित होतात. याच गुणांमुळे विभागातील अनेक विद्यार्थी शासकीय व निमशासकीय सेवेत नोकरी करीत आहेत.
आजच्या काळात सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने, स्मार्ट ग्रिड, ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रिकल अभियंत्यांची मोठी मागणी आहे. फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विभाग विद्यार्थ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाशी परिचित करून देत त्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनवत आहे. विभागामार्फत विविध कार्यशाळा, तांत्रिक स्पर्धा, औद्योगिक भेटी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात.
फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा इलेक्ट्रिकल विभाग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संधींचे दालन उघडत आहे. अनेक विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवत असून काही विद्यार्थी उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उद्योगाभिमुख दृष्टिकोन यामुळे हा विभाग विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी ऊर्जा देत आहे.
ऊर्जेपासून उज्ज्वल भविष्यहे ब्रीद जपत फॅबटेकचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग केवळ अभियंते घडवत नाही, तर समाजाच्या प्रगतीला दिशा देणारे सक्षम तंत्रज्ञ आणि नवोन्मेषक निर्माण करत आहे. त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी हा विभाग एक उत्तम पर्याय ठरत आहे.
