Breaking

Friday, 12 June 2026

उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांचा आज वाढदिवस; शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सायंकाळी कार्यालयात उपस्थित राहणार



सांगोला / प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे नेते तथा उद्योजक बाळासाहेब एरंडे यांचा आज, शनिवार दिनांक १३ जून रोजी वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी बाळासाहेब एरंडे हे आज सायंकाळी ५ वाजल्यानंतर सांगोला–मिरज रोडवरील त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे शुभेच्छुकांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
उद्योग क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असतानाच सामाजिक बांधिलकी जपत विविध विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची त्यांची कार्यशैली विशेष उल्लेखनीय मानली जाते. शिक्षण, सामाजिक उपक्रम, रोजगारनिर्मिती तसेच विविध सार्वजनिक कामांमध्ये त्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद मानले जाते.
सांगोला तालुक्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात आपला सक्रिय सहभाग नोंदवत त्यांनी अनेक उपक्रमांना पाठबळ दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजातील विविध घटकांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण झाली असून वाढदिवसानिमित्त अनेक स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.