ज्योतिर्लिंग ट्रॅक्टर्स, सांगोला येथे धअछचअठ 235 - फोर व्हिल ड्राईव्ह ट्रॅक्टरचे लोकार्पण उत्साहात
सांगोला : प्रतिनिधी -
सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील विश्वासू सहकारी, वाढेगावचे माजी उपसरपंच तथा नवोद्योजक अनिलभाऊ दिघे यांच्या ज्योतिर्लिंग ट्रॅक्टर्स, सांगोला या शोरूममध्ये शेतकरी बांधवांसाठी जपानी तंत्रज्ञानावर आधारित ध-छच-ठ कंपनीच्या अत्याधुनिक धअछचअठ 235- फोर व्हिल ड्राईव्ह या नवीन ट्रॅक्टर मॉडेलचे लोकार्पण माजी आमदार दीपक (आबा) साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या कार्यक्रमास अरविंदभाऊ केदार, उद्योगपती महादेव दिघे, डॉ. मानसिंगराव बाबर, ध-छच-ठ कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, वितरक तसेच तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ट्रॅक्टरचे पूजन व अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना मा.आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले की, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. जपानी तंत्रज्ञानावर आधारित धअछचअठ 235 हे मॉडेल कमी इंधनात अधिक कार्यक्षम, मजबूत आणि शेतकर्यांच्या विविध शेतीकामांसाठी उपयुक्त असल्याने उत्पादनवाढीस मोठी मदत करणार आहे. आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचा वापर केल्यास शेतकर्यांचा वेळ, श्रम आणि खर्चात बचत होऊन शेती अधिक फायदेशीर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित शेतकर्यांनी नवीन ट्रॅक्टरची प्रत्यक्ष पाहणी करून त्याच्या आधुनिक तांत्रिक वैशिष्ट्यांची माहिती घेतली. धअछचअठ 235 कंपनीच्या अधिकार्यांनी ट्रॅक्टरची कार्यक्षमता, तांत्रिक सुविधा आणि विक्रीपश्चात सेवांबाबत सविस्तर माहिती दिली.
ज्योतिर्लिंग ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील शेतकर्यांना आधुनिक, विश्वासार्ह आणि दर्जेदार कृषी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल उपस्थितांनी अनिलभाऊ दिघे यांचे कौतुक केले.
शेतकर्यांच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार अत्यंत आवश्यक आहे. जपानी तंत्रज्ञानावर आधारित धअछचअठ 235 - फोर व्हिल ड्राईव्ह ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे अधिक वेगाने, कमी खर्चात आणि कार्यक्षमतेने होतील. वाढेगावचे माजी उपसरपंच तथा नवोद्योजक अनिलभाऊ दिघे यांनी सांगोला तालुक्यातील शेतकर्यांसाठी हा आधुनिक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि शेतकरी बांधवांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करतो. - *मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील*
