Breaking

Saturday, 20 June 2026

फॅबटेक स्कूल चे प्राचार्य सिकंदर पाटील यांची महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी नियुक्ती*

 


सांगोला : प्रतिनिधी


फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये प्राचार्य पदावर कार्यरत असलेले सिकंदर पाटील यांची नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड सायंटिफिक टेम्परामेंट (छउडडढ) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक (डींरींश उे-ेीवळपरीेीं) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

   छउडडढ ही देशभरात विज्ञान प्रसार, वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती आणि नवोपक्रमांना चालना देणारी ना-नफा तत्त्वावरील संस्था आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि समाजामध्ये तर्कशुद्ध विचारसरणी रुजविण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबविते. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.

या नियुक्तीबद्दल संस्थेचे राष्ट्रीय प्रमुख मल्लिनाथ मठपती यांनी प्राचार्य सिकंदर पाटील यांचे अभिनंदन करत त्यांचे स्वागत केले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विज्ञान चळवळ अधिक व्यापक आणि प्रभावी होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

    या परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि सामाजिक समस्यांवरील नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे.

विशेष बाब म्हणजे या उपक्रमांतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार असून त्यांना इस्रो (खडठज) भेटीची सुवर्णसंधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान, संशोधन आणि नवसंकल्पनांबाबत आकर्षण व प्रेरणा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

याशिवाय विज्ञान जनजागृती कार्यक्रम, शिक्षक प्रशिक्षण, नवोपक्रम स्पर्धा, विद्यार्थी मार्गदर्शन सत्रे, विज्ञान कार्यशाळा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारे विविध उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहेत.

नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना सिकंदर पाटील यांनी संस्थेचे आभार मानले आणि महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत विज्ञानाच्या संधी पोहोचवून वैज्ञानिक विचारसरणी समाजात रुजविण्यासाठी समर्पितपणे कार्य करणार, असा निर्धार व्यक्त केला.

सिकंदर पाटील यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील विज्ञान चळवळीला नवी ऊर्जा मिळणार असून विद्यार्थ्यांसाठी संशोधन आणि नवोपक्रमांच्या नव्या वाटा खुल्या होणार आहेत.

   प्राचार्य सिकंदर पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे आदींसह फॅबटेक परिवारातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.