Breaking

Tuesday, 9 June 2026

मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त 3700 नॅनो युरिया खत बाटल्यांचे शेतकऱ्यांना मोफत वाटप!!

 



 शिवसेनेचा संवेदनशील उपक्रम!!! 

 करमाळा (प्रतिनिधी )
 मुख्यमंत्री वैद्यकीय मदत पक्षाचे मूळ संकल्पना अस्तित्वात आणणारे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त 
 नॅनो युरिया खताचे शेतकऱ्यांना मोफत वाटप बुधवार दिनांक 10 जून ते 15 जून 2026 या दरम्यान पाच दिवस मोफत वाटप होणार असून शेतकऱ्यांनी आधार कार्ड आणून हे युरिया खत महेश ऍग्रो एजन्सी देवीचा माळ रोड करमाळा   
 येथून वाटप सुरू होणार असून शेतकऱ्यांनी येताना आपले आधार कार्ड नोंदवून हे खत घेऊन जावे असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत करमाळा कक्ष प्रमुख नागेश चेंडगे यांनी केले आहे 

 सध्या युरिया खताची मोठी टंचाई असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅनो युरिया वापरावा असे आवाहन केले आहे 
 तूर मूग उडीद मका व भाजीपाला या पिकांसाठी पेरणीनंतर या आधुनिक तंत्रज्ञानाचा नॅनो युरियाची फवारणी 21 दिवसानंतर पिकाला घेतल्यानंतर जमिनीतून युरिया पिकाला घालण्याची गरज नाही 
 जमिनीतील युरियामुळे जमिनीचा पोत खराब होऊन कॅन्सर सारखी गंभीर आजार वाढत आहेत यामुळे शास्त्रज्ञांनी सुद्धा युरिया चा वापर कमी करावा असे आवाहन केले आहे 
 या सर्व बाबी लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खासदार श्रीकांत दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली
  युरियाचे वाटप होणार आहे 
+++++
 एक पोते युरिया खत निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाला जवळपास 2700 रुपये खर्च येतो 
 व हे पोती शेतकऱ्यांना 266 रुपयाला विक्री करावी लागते एका पोत्यामागे 2400 रुपये जवळपास अनुदान खर्च होऊन यातील मोठा खर्च परकीय चलनात होतो यामुळे देशाचेही प्रचंड नुकसान होते शिवाय युरियाचे दुष्परिणाम गंभीर परिणाम असून कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहेत यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांनी जमिनीतून पिकाला युरिया देण्याचे प्रमाण कमी करून अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा नॅनो युरियाचा वापर करावा असे जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री हावळे यांनी केले आहे