Breaking

Thursday, 18 June 2026

19 जुलै रोजी माऊलींचा पालखी सोहळा नातेपुते नगरीत दाखल होणार

 



 नातेपुते  : 


 वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा 2026 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदा बुधवार, दिनांक 8 जुलै रोजी श्री क्षेत्र आळंदी येथून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार असून, 24 जुलै रोजी हा सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथे विसावणार आहे. दरम्यान, रविवार दिनांक 19 जुलै रोजी म्हणजे आज महिन्या  माऊलींचा पालखी सोहळा नातेपुते नगरीमध्ये मुक्कामासाठी दाखल होणार असल्याने स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आळंदी ते पंढरपूर: असा असेल पालखीचा प्रवास

जाहीर वेळापत्रकानुसार, 8 जुलै रोजी आळंदी येथून प्रस्थान झाल्यानंतर 9 व 10 जुलै रोजी पालखीचा मुक्काम पुणे येथे असेल. 11 व 12 जुलै रोजी सासवड, 13 जुलै रोजी जेजुरी, 14 जुलै रोजी वाल्हे आणि 15 जुलै रोजी श्रींचे नीरा स्नान नंतर पालखी सोहळा लोणंद मुक्कामी पोहोचेल. त्यानंतर 16 जुलै रोजी ’चांदोबाचा लिंब’ येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पार पडेल व रात्री पालखी तरडगाव येथे मुक्कामी थांबेल. 17 जुलै रोजी फलटण तर 18 जुलै रोजी बरड येथे माऊलींचा मुक्काम असेल. रविवार 19 जुलै रोजी बरड येथून निघून साधुबुवाचा ओढा नंतर सोलापूर जिल्ह्यात प्रवेश माऊलींच्या पालखीचे भव्य स्वागत होईल धर्मपूरी येथून पालखी सोहळा नातेपुते येथे रात्रीच्या मुक्कामासाठी दाखल होईल.

20 जुलै (सोमवार): नातेपुते येथून मार्गस्थ झाल्यावर माळशिरसकडे जाताना पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण पार पडेल. यानंतर रात्रीचा मुक्काम माळशिरस येथे असेल.

21 जुलै (मंगळवार) माळशिरस येथून निघाल्यानंतर खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होईल, तर रात्रीचा मुक्काम वेळापूर येथे असेल.

22 जुलै (बुधवार): वेळापूर जवळील ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण पार पडेल. या दिवशी वाडीकुरोली येथे टप्पा माऊली संत सोपानदेव काका भेट होईल व रात्रीचा मुक्काम भंडीशेगाव येथे असेल.

23 जुलै रोजी भंडीशेगाव येथून मार्गस्थ झाल्यावर बाजीरावची विहीर येथे चौथे गोल रिंगण व उभे रिंगण संपन्न होईल. यानंतर रात्रीचा मुक्काम वाखरी येथे असेल. 24 जुलै रोजी वाखरीहून निघून पादुकाजवळ आरती व तिसरे उभे रिंगण पूर्ण करत माऊलींची पालखी सोहळा पंढरपूर नगरीत दाखल होईल. श्रींचे चंद्रभागा स्नान श्री विठ्ठल-रुक्मिणी भेटीनंतर 29 जुलै रोजी गोपाळपूर काला संपन्न होऊन पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल.

नातेपुते आणि परिसरातील हजारो भाविक माऊलींच्या स्वागतासाठी दर्शनासाठी आणि रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी सज्ज झाले असून, प्रशासनानेही यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.