Breaking

Wednesday, 13 May 2026

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आज विविध कार्यक्रम...

 

सांगोला/प्रतिनिधी ः



धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा व सकल हिंदू समाज बांधव सांगोला तालुका यांच्यावतीने यावर्षी गुरुवार दिनांक 14/05/2026 रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. तरी आज सकाळी ठीक 9:00 वाजता मूर्ती पूजन व सायंकाळी ठीक 4:00 वाजता भव्य दिव्य शोभायात्रा आयोजित केलेली आहे. यामध्ये खास आकर्षण छत्रपती संभाजी महाराज यांची 12 फूट मूर्ती आहे. वरील सर्व कार्यक्रम शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे होतील. तरी सर्व शिवशंभु प्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असेमंडळातर्फे आव्हान करण्यात आले आहे.