Breaking

Friday, 15 May 2026

कडलास रोडवरील स्टील व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट

 


सांगोला प्रतिनिधी :
सांगोला शहरातील कडलास रोडवर बाहेरून येऊन दुकाने थाटलेल्या परराज्यातील काही स्टील व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू असल्याचा आरोप होत आहे. वजनकाट्यात मोठी तफावत आढळून येत असून, दररोज लाखो रुपयांचा गैरव्यवहार होत असल्याची चर्चा आहे. या दोन्ही स्टील व्यापाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
एका व्यापाऱ्याने एका राज्याच्या नावावर, तर दुसऱ्याने देवीच्या नावाने स्टीलचे दुकान सुरू केले आहे. मात्र, स्टीलच्या वजनात काटा मारणे, हमालीच्या नावाखाली हजारो रुपये वसूल करणे, दरामध्ये फरक करणे, तसेच हिशोबात घोळ घालणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
याशिवाय, संबंधित व्यापारी ग्राहकांशी दादागिरीची भाषा वापरत असून, जबरदस्तीने पैसे वसूल करत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे कडलास रोडवरील या स्टील व्यापाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सर्वसामान्य ग्राहकांकडून होत आहे.