सांगोला प्रतिनिधी -
रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण विद्यालय फळवणी शाखेचे मुख्याध्यापक तथा आजीव सदस्य श्री.राजेंद्र भागवत केदार यांची संस्थेच्या समन्वय समिती (माध्यमिक शिक्षण समिती )सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, सय्यद वरवडे ता. मोहोळ या शाखेत विद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी साडेचार एकर जमीन मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सदर विद्यालयाच्या बांधकामासाठी लोकवर्गणीतून जवळजवळ पाच लाख रुपये मिळवून देण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्या शाखेचे बांधकाम समितीचे चेअरमन म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले .गरीब विद्यार्थ्यांना मदत ,रक्तदान शिबिराचे आयोजन ,महाराष्ट्र शासनाच्या वनीकरण विभागाकडून रोपे मिळवून एक मूल ,एक झाड याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यास वृक्षारोपण करण्यास प्रवृत्त केले .साक्षरता अभियान मध्ये मास्टर ट्रेनर ,(मोहोळ पंचायत समिती )तसेच अंधश्रद्धा निर्मूलन या सामाजिक कार्यात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले .
रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागांतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयाचे प्रभावी अध्यापन करून या विषयावर 2007 व 2008 या दोन वर्षात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे .तसेच सोलापूर जिल्हा विज्ञान मंडळ स्थापन करणे व त्यामध्ये कोषाध्यक्ष म्हणून तीन वर्षे काम पाहिले आहे. इयत्ता दहावी गणित विषयाचा सतत 100% निकाल तसेच स.शा . लिगाडे विद्यालय व जुनियर कॉलेज अकोला वासूद च्या बांधकामासाठी निधी गोळा करणे ,एन एम एम एस परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले यश व त्यांनी केलेले विभाग प्रमुख म्हणून नियोजन या कार्याचा संस्थेने विचार करून त्यांची संस्थेच्या समन्वय समितीवर निवड केली आहे.
क्रीडा विभाग सोलापूर यांचे कडून वॉल कंपाऊंड ,खेळाचे मैदान यासाठी प्रस्ताव तयार करून अनुदान मिळविण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे .संस्थेने दिलेल्या पाच लाख रुपयांतून अकोला वासूद शाखेत शेततळे तयार करणे ,बोर पाडणे ,पेरूची झाडे लावणे तसेच ज्युनिअर कॉलेजच्या बांधकामासाठी निधी गोळा करून बांधकाम पूर्ण करण्यामध्ये त्यांनी विशेष प्रयत्न केले .
मांजरी हायस्कूल ,मांजरी या ठिकाणी लोक वर्गणीतून विद्यालयास रंगकाम ,सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे तसेच वर्ग खोल्याचे बांधकाम ग्रामस्थ व स्टाफ च्या मदतीने पूर्ण केले.
यशवंतराव चव्हाण विद्यालय ,फळवणी मध्ये लोक वर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरा तसेच मुला मुलींचे स्वच्छतागृह ,विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्कूल कमिटीच्या मदतीने कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय केली. विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले .वरील सर्व बाबींचा विचार करून संस्थेने त्यांच्या कामाची दखल घेतली. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये जाऊन गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. गतवर्षी त्यांना माजी प्राचार्य एन. आर .माने निष्ठावान गुणी रयत सेवक पुरस्काराने सन्मानित केले होते .संस्थेने याची दखल घेऊन त्यांची संस्थेच्या समन्वय समिती सदस्य पदी निवड केली .याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या निवडीबद्दल मा.विकास देशमुख, सचिव ,रयत शिक्षण संस्था सातारा ,डॉ.शिवलिंग मेन कुदळे मा. डॉ.राजेंद्र मोरे ,मा. बी एन .पवार सहसचिव (माध्य )सातारा ,मा.प्रा नानासाहेब लिगाडे ,मा.डॉक्टर जे .जी .जाधव साहेब ,मा .नवनाथ जगदाळे विभागीय अधिकारी, मा.एन टी निकम ,मा.दिनेश दाभाडे ,मा.कृष्णा रेडे ,प्राचार्य बी .टी .जाधव, मा .बाळासाहेब बळवंत, स्कूल कमिटी सदस्य ज्योतीराम अवताडे, युवराज बापू अवताडे ,अण्णासाहेब डोंगरे ,सचिन पाटील ,अशोक आसबे , वासुद प्लांटेशन ग्रुपचे मार्गदर्शक पोपट केदार, उद्योगपती सुदाम भोरे ,सचिन शिंदे साहेब ,बाळासाहेब सावंत,जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक ,शिक्षक ,रयत सेवक यांनी अभिनंदन केले.
