Breaking

Monday, 27 April 2026

सध्या वीज कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी "थेट फोन नकोच ~ उपअभियंता हनुमंत बनसोडे

 

हातीद महावितरणचे ग्राहकांना आवाहन...




कोळा वार्ताहर 
सध्याच्या परिस्थितीमध्ये वीजपुरवठा खंडित झाला की तातडीने वीज कर्मचाऱ्याला किंवा वायरमनला फोन लावला जातो मात्र, तुमचा हा एक फोन दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतू शकतो. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य महावितरणने ग्राहकांना थेट फोन न करण्याचे व तक्रार नोंदणीसाठी उपलब्ध असलेल्या अधिकृत पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन केले असल्याची माहिती हातीद विभागाचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता हनुमंत बनसोडे यांनी दिली आहे.
पुढे बोलताना उपकार्यकारी अभियंता हनुमंत बनसोडे म्हणाले  सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दुरुस्तीचे काम सुरू असताना कर्मचाऱ्याचे पूर्ण लक्ष तांत्रिक बाबींकडे असणे आवश्यक असते. अशावेळी ग्राहकाचा फोन आल्यास त्यांचे लक्ष विचलित होऊन भीषण अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा कर्मचारी कामात व्यस्त असल्याने फोन उचलू शकत नाहीत, ज्यामुळे ग्राहकांचा रोष वाढतो. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कामातील एकाग्रता कायम राखण्यासाठी कॉल सेंटर किंवा मोबाईल ॲपचा वापर करणे हिताचे आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर १० ते १५ मिनिटे वाट बघितल्यानंतर 
तक्रार महावितरणकडे नोंदवा. व्हाट्सअप वर  सेवा उपलब्ध ग्राहकांनी ९१६७७७७७२१ या क्रमांकावर संदेश पाठवून भाषा निवडल्यास त्यांना वीजबिल पाहणे, भरणे किंवा तक्रार नोंदवणे यांसारख्या सुविधा मिळतील. अधिकृत खात्याची खात्री करण्यासाठी कंपनीच्या नावापुढील ब्ल्यू टीक तपासावी.२४ तास टोल-फ्री सेवा, मोबाईल ॲप ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणचे १८००-२३३-३४३५, व १८००-२१२-३४३५ येते. आणि १९१२ हा टोल-फ्री क्रमांक २४ तास कार्यरत आहेत. याशिवाय, महावितरण मोबाईल ॲपच्या माध्यमातून एकाचवेळी अनेक वीज जोडण्यांचे व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे. एसएमएस आणि मिस कॉलची सुविधा ज्या ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे, त्यांना केवळ एक मिस कॉल देऊन तक्रार नोंदवता येईल. त्यासाठी ०२२-५०८९७१०० हा क्रमांक उपलब्ध आहे. तसेच, ९९३०३९९३०३ या क्रमांकावर एसएमएस पाठवूनही तक्रार नोंदवता असे उपकार्यकारी अभियंता बनसोडे यांनी सांगितले आहे.