विद्यामंदिर परिवारातर्फे भव्य प्रभात फेरी संपन्न
कोळा :-
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पंचायत समिती सांगोला यांच्या परिपत्रकानुसार कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोळा यांच्यावतीने बुधवार दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता संविधान जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणार्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून गावातील प्रमुख मार्गावरून संविधान जागृती प्रभात फेरी काढण्यात आली. या संविधान जनजागृती फेरीमधून भारतीय संविधानाचा आदर आणि त्यातील समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांचे महत्त्व जनतेला कळावे हा उद्देश होता. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचा विजय असो, समता, स्वातंत्र्य, बंधुता हीच आमची ओळख अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. या फेरीमध्ये संविधानामुळे मिळालेले हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी हातात फलक धरले होते. याप्रभातफेरीमध्येप्राचार्य श्रीकांत लांडगे सर, पर्यवेक्षक चारूदत्त जगताप सर, मा. उपसरपंचडॉ. सादिक पटेल, उत्तम आलदर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
