Breaking

Wednesday, 11 March 2026

नाझरे येथे शॉर्टसर्किटने घराला भीषण आग...*

 चाळीस लाखाचे नुकसान,.. पाटील कुटुंब उघड्यावर..* 

नाझरे प्रतिनिधी -



      नाझरे ता. सांगोला येथील रहिवाशी रायाप्पा रामचंद्र पाटील यांच्या राहत्या घराला मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी शॉर्ट सर्किट अचानक आग लागली यात संपूर्ण घर जळून भस्मसात झाले व या भीषण आगीत कपडे, भांडी, सोने, चांदीसह रोख रक्कम, अन्नधान्य, संसार उपयोगी साहित्य जळून सुमारे 40 लाख 50 हजाराचे नुकसान झाले आहे व त्यामुळे पाटील कुटुंब उघड्यावर पडले आहे. 

    सदर घटनेचा पंचनामा मंडलाधिकारी हरिश्‍चंद्र जाधव, गाव कामगार तलाठी राजेंद्र जाधव, पोलीस पाटील लक्ष्मण बनसोडे यांनी केला असून, मनोज रायाप्पा पाटील यांनी डाळिंब विकून आलेले पैसे घरातील कपाटात ठेवले होते, मंगळवारी शॉर्टसर्किट होऊन अचानक घराला आग लागली, आग एवढी भीषण होती की घरातील सर्व वस्तू तर जळाल्या परंतु घराच्या वरती असलेले खांडे दांडे, पत्रे सुद्धा जळून खाक झाले पण सुदैवाने घरातील सर्व मंडळी बाहेर पडल्याने मनुष्यहानी झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच पाटील परिवार, मित्रपरिवार, ग्रामस्थ यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले व आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. 

      टीव्ही, फ्रिज, एसी, पंखे आदीसह अनेक विद्युत उपकरणे जळून खाक झाली. पाटील कुटुंबाची सर्व गुजराण शेतीवर असून, परिस्थिती बेताची आहे, तरी राजकीय, व्यक्तींनी, दानशूर व्यक्तींनी, सामाजिक संस्था आणि कुटुंबाला सढळ हाताने मदत करावी व शासकीय विभागाने ही पाटील कुटुंबीयांना जास्तीत जास्त नुकसान मिळण्यासाठी मदत करावी. तसेच आजी माजी आमदार आणि याकडे लक्ष देऊन तातडीने मदत मिळवून द्यावी अशी नागरिकात बोलले जात आहे. सध्या तरी हे कुटुंब उघड्यावर पडले आहे व त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे.