सांगोला/प्रतिनिधी ः
घेरडी ता. सांगोला : दि. 7 मार्च 2026 रोजी घेरडी (ता. सांगोला) येथे जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेरडी येथे महिलांसाठी पाककला स्पर्धा व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या मा.सौ. संगीताताई मोटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ. जयमालाताई गायकवाड, घेरडी ग्रामपंचायत सरपंच मा.सौ आरतीताई जगधने, माजी सरपंच घेरडी सौ सुरेखाताई पुकळे, घेरडी गटनेते मा. आबासाहेब मोटे,मा.सौ. दिपाली जाधव कृषी अधिकारी,मा.श्री. पांडुरंग झोळ मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मा.सौ. दिपाली जाधव मॅडम तालुका कृषी अधिकारी यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगून आरोग्यदायी आहार घेऊन स्वतःचं व कुटुंबाचे आरोग्य सुदृढ करावे तसेच कृषी विभागामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणार्या विविध योजना, स्वावलंबनासाठी उपलब्ध संधी तसेच महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले.
तसेच मा.सौ. संगीताताई मोटे जिल्हा परिषद सदस्या यांनी महिलांना मार्गदर्शन करत महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व महिलांनी विविध क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले. घेरडी गावच्या महिला विद्यमान सरपंच मा.सौ. आरतीताई जगधने व माजी सरपंच सुरेखाताई पुकळे यांनीही उपस्थित महिलांना शुभेच्छा देत महिलांच्या सहभागामुळे गावाच्या विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्री. प्रतीक डुबल यांनी कृषी विभागाच्या महाविस्तार ए आय एप्लीकेशनबाबत माहिती देत महिलांनी कृषी व पूरक व्यवसायांमध्ये सहभागी होऊन उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. जयमालाताई गायकवाड होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत सेंद्रिय शेतीचे महत्व व त्याचे आहारातील महत्त्व सांगून आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी सेंद्रिय शेतकरी गट उभा करून महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि उद्योग यामध्ये पुढाकार घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 22 महिलांनी सहभाग घेतला. पाटील मॅडम व साळुंखे मॅडम यांनी परीक्षक म्हणून काम पहिले स्पर्धेत उत्कृष्ट पाककला सादर करणार्या प्रथम क्रमांक सौ संध्याराणी वटकर, द्वितीय क्रमांक सौ अस्मा खलिफा, तृतीय क्रमांक सौ मैना घुटुगडे, उत्तेजनार्थ क्रमांक समीना पठाण या विजेत्या महिलांना कृषी विभागातर्फे पैठणी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
यानंतर महिलांसाठी सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांचे आयोजन सहाय्यक सहाय्यक कृषी अधिकारी श्री. बाळासाहेब सावंत यांनी केले. खेळांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणार्या महिलांना गिफ्ट देऊन गौरविण्यात आले.
तसेच आबासाहेब मोटे यांच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन शबाना अत्तार मॅडम व स्मिता पंडित मॅडम यांनी केले. महिला दिन का साजरा केला जातो तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. उत्कर्ष चंदनशिवे यांनी करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
या कार्यक्रमास सहाय्यक कृषी अधिकारी श्री खरात साहेब व कोळी साहेब उपस्थित होते उपस्थित महिलांनी असेच कार्यक्रम वेळोवेळी उपस्थित करून महिलांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी असे मत व्यक्त केले घेरडी गावातून 154 महिला उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन व भोजनानंतर जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
