Breaking

Monday, 9 February 2026

सांगोल्यात जिल्हा परिषद महायुतीकडे तर ; पंचायत समितीत शेकाप-दीपकआबा गटाचे निर्विवाद वर्चस्व.

 


सांगोला /प्रतिनिधी 

-जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकाप , दीपक आबा साळुंखे पाटील गट, व रासप च्या विकास आघाडीला जिल्हा परिषदेत तीन व पंचायत समिती शेकाप , दीपक आबा साळुंखे पाटील गटाला नऊ जागा तर भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला जिल्हा परिषदेत चार व पंचायत समितीत पाच जागा मिळाल्या असून पंचायत समितीत आघाडीला बहुमत मिळाले आहे 


जिल्हा परिषदेचे सात गट असून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला दोन, भाजपला एक , राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक तर विकास आघाडीतील शेकापला तीन जागा मिळाल्या आहेत 

पंचायत समितीच्या 14 गणात विकास आघाडीतील शेकापला सहा तर साळुंखे पाटील गटाला तीन अशा नऊ जागा मिळाल्या आहेत तर महायुतीतील शिवसेनेला चार तर भाजपला एक जागा मिळाली आहे 

जिल्हा परिषद निवडणुकीत जवळा गटातून माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे चिरंजीव यशराजे साळुंखे पाटील यांचा पराभव हा धक्कादायक समजला जातो तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर यांचाही पराभव भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे तर माजी आमदार शहाजी पाटील यांच्या स्नुषा राणी सुरज पाटील यांच्या विजयाने सर्वत्र जल्लोष होत आहे


तालुक्यात प्रथमच भाजपला एक जिल्हा परिषद व एक पंचायत समितीचे गण वर विजय मिळवून कमळ फुलविता आले आहे तर यापूर्वी नगर परिषदेत भाजपचे चार नगरसेवक विजयी झाले आहेत म्हणजेच शहरात व ग्रामीण भागात प्रथमच कमळ फुललेले आहे . काही गणात शिवसेनेचे उमेदवार अल्पशा मताने पराभूत झाल्याने पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही हे स्वप्न पूर्ण करतात का याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे


महूद गटात महायुतीतील शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे यांना 16,108 मते (विजयी) तर आघाडीतील शेकापचे बाळासाहेब ढाळे यांना 9785 मते मिळाली.


महूद पंचायत समिती गणात शिवसेनेच्या सोनाली पाटील यांना 7682 (विजयी) तर आघाडीतील शेकापचे मनीषा येडगे यांना 5658 मते मिळाली तर चिकमहुद गणात शिवसेनेचे बाळासाहेब बंडगर 7502 मते (विजयी) तर शेकापचे राकेश कदम यांना 5566 मते मिळाली आहे 


एकतपुर गटात विकास आघाडीचे उमेदवार सिंधुताई आलदर 13582 मते (विजयी) तर महायुतीचे शिल्पा माने यांना 11037 मते मिळाली 


एकतपुर गणात आघाडीतील शेकापचे सुवर्णा नवले 7409 मते (विजयी) तर महायुतीतील भाजपच्या ऋतुजा जानकर यांना 5166 मते मिळाली वाकी शिवणे गणात आघाडीतील शेकापचे स्मिता गोडसे 6502 मते (विजयी) तर महायुतीतील शिवसेनेच्या सुनीता बाड यांना 5351 मते मिळाली 


जवळा गटात महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अतुल पवार यांना 15031 मते ( विजयी) तर विकास आघाडीतील साळुंखे पाटील गटाचे सूर्यादित्य उर्फ यश राजे साळुंखे पाटील यांना 13504 मते मिळाली 


जवळा पंचायत समिती गणात विकास आघाडीतील साळुंखे पाटील गटाचे पुनम इंगवले यांना 8376 मते (विजयी) तर महायुतीतील भाजपचे भारती देशमुख यांना 3982 मते मिळाली वाडेगाव गणात विकास आघाडीतील शेकापचे वंदना शेळके 6876 मते (विजयी) तर महायुतीतील शिवसेनेचे राणी उबाळे यांना 6522 मते मिळाली 


कडलास गटात महायुतीतील शिवसेनेच्या शोभा खटकाळे16093 मते (विजयी) तर महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष संगीता शिंदे यांना 7490 मते मिळाली 


कडलास गणातून शिवसेनेच्या राणी सुरज पाटील 8421 (विजयी) तर अपक्ष धनाजी पवार यांना 3687 मते मिळाली. अजनाळे गणातून विकास आघाडीचे साळुंखे पाटील गटाचे बापू जावीर यांना 4124 मते (विजयी) तर शिवसेनेचे मीनाक्षी केंगार यांना 4017 मते मिळाली


चोपडी जिल्हा परिषद गटातून भाजपाचे जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांना 14844 मते(विजयी) तर आघाडीतील अपक्ष उमेदवार विजयकुमार शिंदे यांना 7997 मते मिळाली .


राजुरी गणातील महायुतीतील भाजपाचे सदाशिव दबडे यांना 6982 मते (विजयी) तर आघाडीतील समाधान रुपनर यांना 4707 मते मिळाली आहेत चोपडी गणात महायुतीतील शिवसेनेचे अजय सरगर यांना 7196 (विजयी) तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल जगदाळे यांना 5040 मते मिळाली 


कोळा गटात आघाडीतील शेकापचे किरण उर्फ केरप्पा पांढरे यांना 14,169 मते (विजयी) तर महायुतीतील भाजपाचे संभाजी आलदर यांना 12867 मते मिळाली आहेत 


याच गटातील कोळा गणात शेकापचे छाया कोळेकर यांना 7143 मते (विजयी) तर शिवसेनेच्या सुलाबाई घेरडे यांना 6554 मते मिळाली. हातीद गणात आघाडीतील शेकापचे अमृत पाटील 7092 मते (विजयी) तर भाजपाचे पोपट गडदे यांना 6498 मते मिळाली आहे 


घेरडी गटात आघाडीतील शेकापच्या संगीता मोटे यांना 13,617 मते (विजयी) तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या शुभांगी मोटे यांना

7173 मते मिळाली आहे सोनंद गणातून आघाडीतील शेकापचे काजल काशीद यांना 5718 मते (विजयी) तर वर्षा गवंड या अपक्ष उमेदवारास 2561 मते मिळाली आहेत. घेरडी गणात आघाडीतील साळुंखे पाटील गटाचे अपक्ष उमेदवार अशोक चोरमुले 5952(विजयी) तर नवनाथ भोसले यांना 3591 मते मिळाली आहे


विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी करून, गजी ढोल, हालग्याच्या निनादात मिरवणूक काढून राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्याला हार घालून कार्यकर्त्यांच्या समवेत आनंद व्यक्त केला 


आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन गुलालाची उधळण करून आशीर्वाद घेतला तर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या समर्थकांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन गुलाल लावून आशीर्वाद घेतला तसेच माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांचे कार्यालयात विजयी विजयी उमेदवारांनी जाऊन आशीर्वाद घेतला भाजपाच्या कार्यालयात स्वतः जिल्हाध्यक्ष निवडून आल्याने त्यांच्या शेकडो कार्यकर्ते व समर्थकांच्या सहाय्याने मिरवणूक काढून राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पा अर्पण करून आनंद व्यक्त केला


सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि तीन वाजेपर्यंत सर्व गटाचे गणाचे निकाल निवडणूक अधिकारी बी आर माळी तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळाबाई भागवत नोडल अधिकारी मिलिंद सावंत व त्यांच्या सर्व टीमने प्रयत्न केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.